ST Bus Brand Ambesidor Ritesh Deshmukh And Jenelia Deshmukh: एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल घडत आहेत. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, एसटीचा प्रवास सुलभ व्हावा तसेच एसटीचा तोटाही कमी होऊन चांगल्या सेवा दिल्या जाव्यात, यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया रितेश देशमुख यांची एसटीचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठी अभिनेते रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया रितेश देशमुख यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून ५ वर्ष करारावर नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर कराराचे हस्तांतरण लवकरच केले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सदर कराराचे हस्तांतरण केले जाणार आहे. यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विनंती केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर या करार हस्तांतरण कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ राखून ठेवण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसेडर होणार असल्याचे समजताच सोशल मीडियावर याबाबत चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. सन २०२३ मध्ये मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, आताच्या घडीला राजा शिवाजी या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख चर्चेत आहेत. 'राजा शिवाजी' हा सिनेमा रितेश देशमुख आणि जिनेलिया यांच्यासाठी अनेक कारणांमुळे खास ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
Web Summary : Riteish and Genelia Deshmukh appointed as brand ambassadors for Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) for five years. The agreement will be formalized soon in the presence of Chief Minister. This initiative aims to improve services and reduce losses for MSRTC.
Web Summary : रितेश और जेनेलिया देशमुख को महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) का पांच साल के लिए ब्रांड एंबेसडर नियुक्त किया गया। मुख्यमंत्री की उपस्थिति में जल्द ही समझौते को औपचारिक रूप दिया जाएगा। इस पहल का उद्देश्य MSRTC के लिए सेवाओं में सुधार और नुकसान को कम करना है।