Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज बुधवार २२ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १०५ रुपयांची घट झाली असून चांदी प्रति किलो ८३६ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता चांदीचा दर २,४९,६७७ रुपये प्रति किलोवर आला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर
IBJA नुसार, आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ९६ रुपयांनी घसरून १,३९,४६१ रुपयांवर आला आहे. या किमतीवर जीएसटी लावण्यात आलेला नाही. तसंच १८ कॅरेट सोन्याचे दरही आज ७८ रुपयांनी स्वस्त झाले असून आता १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत १,१४,१८८ रुपये झाली. यावरही जीएसटीचा समावेश नाही.
१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर
सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याची किंमत १०५ रुपयांनी घसरून १,५१,६४० रुपयांवर आली. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत ६२ रुपयांनी कमी होऊन ८९,०६६ रुपये झाली आहे.
सर्वकालीन उच्चांकावरून मोठी घसरण
IBJA दरांनुसार, सोनं आता सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा (All Time High) २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर चांदीच्या किमतीत उच्चांकी दरापेक्षा १,३६,२५६ रुपयांची घसरण नोंदवण्यात आलीये. युद्धाच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास, आतापर्यंत सोनं ६,८४७ रुपयांनी तर चांदी १८,२२३ रुपयांनी घसरली आहे.
Web Summary : Good news for gold buyers! Gold and silver prices have fallen in the bullion market. Gold decreased by ₹105 per 10 grams, silver by ₹836 per kg. Gold is now ₹23,871 cheaper than its all-time high.
Web Summary : सोना खरीदारों के लिए अच्छी खबर! सर्राफा बाजार में सोना और चांदी की कीमतों में गिरावट आई है। सोने में ₹105 प्रति 10 ग्राम, चांदी में ₹836 प्रति किलो की गिरावट आई है। सोना अब अपने उच्चतम स्तर से ₹23,871 सस्ता है।