Join us
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:17 IST

Diet Coke shortage India 2026: इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापार विस्कळीत झाला आहे. आखाती देशांतून येणाऱ्या ॲल्युमिनियम कॅनच्या टंचाईमुळे भारतात डाएट कोकचा पुरवठा थांबला असून ग्राहकांचे हाल होत आहेत.

कडाक्याच्या उन्हात डाएट कोकची मागणी प्रचंड वाढली असतानाच, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील दुकानांमधून या पेयाचे कॅन गायब झाले आहेत. मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे. तुम्ही म्हणाल ते कसे काय, कोक तर पुण्यातील कोकाकोला कंपनीत तयार होते. पुढे वाचा...

झालेय असे की, मध्य पूर्वेतील तणावामुळे भारताच्या आयात-निर्यात साखळीवर गंभीर परिणाम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून, भारतात डाएट कोकची विक्री प्रामुख्याने ज्या ॲल्युमिनियम कॅनमध्ये केली जाते, त्यांचा पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून रखडला आहे. आखाती देशांतून येणारी या कॅनसाठीच्या अॅल्युमिनिअमची जहाजे होर्मुझमधील नाकेबंदीमुळे भारतात पोहोचू शकलेली नाहीत. जगातील सुमारे ९ टक्के ॲल्युमिनियमचे उत्पादन आखाती देशांत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 

पॅकेजिंगचा पेचभारतात कोका-कोलाची इतर पेये प्लास्टिक बॉटल्स आणि कॅन या दोन्ही स्वरूपात मिळतात. परंतु, डाएट कोक केवळ कॅनमध्येच उपलब्ध असल्याने ॲल्युमिनियमच्या टंचाईचा या ब्रँडला सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये डाएट कोकचा स्टॉक एकतर संपला आहे किंवा अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे.

डिस्ट्रीब्युटर्सची अडचण: अनेक डिस्ट्रीब्युटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, कोका-कोला कंपनीने पुरवठा मर्यादित केला असून नवीन ऑर्डर्स पूर्ण केल्या जात नाहीत. पुरवठा साखळीतील अडथळ्यांव्यतिरिक्त, भारतीय मानक ब्युरोच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या नवीन आणि कडक नियमांमुळेही डाएट कोकच्या आयातीवर परिणाम झाला आहे. परिणामी कोका-कोला कंपनी सध्या आपल्या रेग्युलर उत्पादनांना प्राधान्य देत असून डाएट कोकचा पुरवठा मर्यादित केला आहे.या संदर्भात कोका-कोला कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या मागणीमुळे डाएट कोकप्रेमींची मोठी गैरसोय होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Diet Coke Shortage Hits India Amidst Middle East Conflict

Web Summary : Diet Coke faces shortage in Indian cities due to Middle East tensions disrupting aluminum can supplies. Packaging issues and import regulations exacerbate the problem, forcing Coca-Cola to prioritize regular products, leaving consumers wanting.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरइराण