शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:35 IST

महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीचा अनुभव मिळेल.

देशातील इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच दिग्गज इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने (Tesla) भारतीय बाजार आपली नवीन 'Model Y L' ही ६-सीटर लक्झरी SUV लाँच केली आहे. या नवीन कारची किंमत ६१.९ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टँडर्ड मॉडेल 'Model Y' पेक्षा सुमारे २ लाख रुपयांनी अधि आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार 'लॉन्ग व्हीलबेस' व्हर्जनमध्ये उपलब्ध असल्याने यात ग्राहकांना अधिक प्रशस्त जागा आणि लक्झरीअस अनुभव मिळेल.

६ लोक आरामात प्रवास करू शकतातया नवीन मॉडेलमध्ये ३०४० मिमीचा मोठा व्हीलबेस देण्यात आला आहे, यामुळे केबिनमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक जागा मिळते. 'Model Y' मध्ये प्रथमच तीन रांगांची आसनव्यवस्था देण्यात आली असून, यात ६ लोक आरामात प्रवास करू शकतात. दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्ससह अ‍ॅडजस्टेबल आर्मरेस्ट देण्यात आले आहेत. कारचे केबिन शांत ठेवण्यासाठी प्रगत साउंड इन्सुलेशन आणि प्रीमियम मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे, यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होतो.

टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास -या कारमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ड्युअल मोटर सेटअप देण्यात आला आहे. ही SUV अवघ्या ५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग धारण करू शकते, तर हिचा टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास एवढा आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हिची रेंज. एकदा फुल चार्ज केल्यानतंर ही कार तब्बल ६८१ किलोमीटरपर्यंत (WLTP रेंज) धावू शकते. यामुळे एखादे कुटुंब दूरचा प्रवासही आरामत करू शकते.

खास टेक्नॉलॉजी अन् जबरदस्त फीचर्स -या कारमध्ये मोठी टचस्क्रीन सिस्टीम देण्यात आली आहे. जिच्य सहाय्याने कारचे बहुतांश फीचर्स नियंत्रित करता येतात. याशिवाय, अ‍ॅडॉप्टिव्ह सस्पेंशन, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि प्रगत सुरक्षा फीचर्स यांमुळे ही कार लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Tesla Model Y L: New 6-seater SUV enters India with 681km range!

Web Summary : Tesla launched its Model Y L, a 6-seater luxury SUV, in India for ₹61.9 lakh. Offers spacious interiors, a 681km range, and accelerates 0-100 kmph in 5 seconds. Features advanced tech and a top speed of 201 kmph.
टॅग्स :Teslaटेस्लाElectric Carइलेक्ट्रिक कारcarकारAutomobileवाहन