शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:50 IST

१० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला होता.

नागपूर : जिममध्ये शरीराचे कमालीचे पिळदार प्रदर्शन करण्याच्या नादात तरुण आपल्या जिवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटून (आर्टरी डिसेक्शन) अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला नागपुरातील डॉक्टरांनी 'गोल्डन अवर'मध्ये शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या दाढेतून परत आणले आहे.

१० एप्रिल रोजी ओम भोयर हा २३ वर्षांचा तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करून घरी परतला. मात्र, काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला. सुदैवाने त्याची आई आरती भोयर या स्वतः नर्स असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून हा पॅरालिसीसचा अटॅक असल्याचे ओळखले आणि तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला. 

न्युरोव्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट डॉ. सचिन ढोमणे यांनी तपासणी केली, 'एमआरआय'च्या अहवालात ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फाटून गंभीर रक्तस्राव झाल्याचे आणि रक्ताची गुठळी साचल्याचे निदान झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णाला तातडीने क्रीसेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पायाच्या शिरेतून मेंदूवर शस्त्रक्रिया

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. ढोमणे यांनी 'इंडोव्हॅस्कूलर सर्जरी' करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' या आधुनिक तंत्राचा वापर केला. यामध्ये रुग्णाच्या पायात एक छोटेसे छिद्र करून कॅथेटरच्या साहाय्याने डॉक्टर थेट मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले. तेथे अडकलेली रक्ताची गुठळी 'न्युरो स्टेंट'च्या मदतीने अत्यंत कौशल्याने बाहेर काढली. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि ओमचा अर्धांगवायू बरा होण्यास सुरुवात झाली.

व्हेंटिलेटरवरून थेट स्वतःच्या पायावर !

शस्त्रक्रियेवेळी ओमची प्रकृती इतकी खालावली होती की त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. मात्र, १० दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर, २१ एप्रिल रोजी ओम स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून घरी गेला. स्ट्रेचरवर आलेल्या तरुणाने चालत घरी जाणे, हे सर्वात मोठे समाधान असल्याचे डॉ. ढोमणे यांनी सांगितले.

पहिले ६ तास 'गोल्डन अवर'

अशा रुग्णांसाठी पहिले ६ तास हे 'गोल्डन अवर' असतात. जितक्या लवकर 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' होईल, तितक्या लवकर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढते. ओमच्या बाबतीत वेळेत घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला. काही रुग्णांमध्ये २४ तासांपर्यंत ही शस्त्रक्रिया करता येते, असेही डॉ. ढोमणे म्हणाले.

तरुणांनो सावधान, डॉक्टरांचा सल्ला काय?

हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजीज खान यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, जिम नेहमी 'सर्टिफाइड' जिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच करायला हवे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांकडून आपली शारीरिक तपासणी करून घ्यायला हवी. स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवे. अन्यथा अतिउत्साह जिवावर बेतू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Over-exercising at gym ruptures young man's brain; doctors save life.

Web Summary : A 23-year-old in Nagpur suffered brain hemorrhage due to over-exercising. Doctors performed a critical surgery within the 'golden hour,' saving his life. He recovered and walked home after ten days thanks to prompt diagnosis and treatment.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यdoctorडॉक्टर