जेरुसलेम: इस्रायलच्या स्मृतिदिनी मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी एका विशेष मोहिमेचा उलगडा केला. ज्या एजंटचा उल्लेख केवळ 'मेम' या हिब्रू अक्षराने केला जात आहे, तो इस्रायलच्या 'ऑपरेशन रोअरिंग लायन' चा कणा होता. इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी मोहिमांना चाप लावणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 'मेम' यानेच विकसित केला होता.
इटलीतील तो अपघात आणि गुप्त बैठक मे २०२३ मध्ये इटलीच्या मॅगीओर तलावात 'गुडूरिया' नावाची पर्यटक नाव उलटली होती. इटालियन मीडियानुसार, ही केवळ सहल नव्हती तर इस्रायली आणि इटालियन गुप्तचरांची एक महत्त्वाची कार्य बैठक होती. त्या नौकेवर २३ पैकी १९ जण आजी-माजी गुप्तहेर होते. अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, ज्यात 'मेम' यांचा समावेश होता.
गंभीर निष्काळजीपणाया नौकेची क्षमता १५ प्रवाशांची असताना त्यावर २३ जण स्वार होते. या प्रकरणी नौकेच्या कॅप्टनला ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा अपघात होता की घातपात हे समोर आणलेले नाही.
इराणविरुद्धच्या यशाचे गुपितडेव्हिड बार्निया यांच्या मते, इराण आणि इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात इस्रायलने जे यश मिळवले, त्याचा पाया 'मेम' याने रचला होता. त्याने रचलेली सर्जनशील आणि तांत्रिक व्यूहरचना आजही इस्रायलच्या संरक्षण दलाला कामी येत आहे. 'मेम' यांची खरी ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही, मात्र इटालियन मीडियात त्यांचे नाव एरेज शिमोनी (५० वर्षे) असे सांगण्यात आले होते.
Web Summary : Mossad revealed agent 'Mem' crucial to disrupting Iran's nuclear program died in Italy. His tech innovations underpin Israel's defense strategy. A boat accident may have been to blame.
Web Summary : मोसाद ने खुलासा किया कि ईरान के परमाणु कार्यक्रम को बाधित करने में अहम एजेंट 'मेम' की इटली में मौत हो गई। उनकी तकनीकी नवाचार इजरायल की रक्षा रणनीति का आधार है। एक नाव दुर्घटना संभावित कारण है।