इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बालीमध्ये एका भारतीय कुटुंबाच्या कृत्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. उबुद येथील एका हॉटेलमध्ये राहिलेल्या या कुटुंबाने हॉटेलमधील वस्तू चोरल्याचा आरोप होता, जो झडतीदरम्यान खरा ठरला आहे. अशा चोरट्या पर्यटकांमुळे त्यांच्याशी संबंध नसलेल्या भारतीय पर्यटकांना यापुढे संशयाच्या नजरेने पाहिले जाणार आहे.
अनेकदा हॉटेलमधून छोट्या छोट्या वस्तू चोरीला जातात. पर्यटक किंवा ग्राहक म्हणा हळूच टुथपेस्ट, टुथब्रश, साबन, शाम्पू, टॉवेल आदी गोष्टी बॅगेत सरकवतात. बालीमध्ये फिरायला गेलेल्या या जोडप्याने हॉटेलची अख्खी रुमच साफ केली. काय काय नाही चोरले ते पहा... नव्या प्रकारची इस्त्री, ड्रायर, टॉवेल अशा साऱ्या महागड्या वस्तू कपड्यांत, टॉवेलमध्ये गुंडाळून हे भारतीय पर्यटक बॅगा गाडीत ठेवत होते. चेक आऊट केल्यामुळे हॉटेलचे कर्मचारी लगेचच रुममध्ये गेले होते, तिथे त्यांना या वस्तू आढळून आल्या नाहीत. यामुळे त्यांनी या पर्यटकांना पार्किंगमध्ये येत सुटकेस उघडण्यास सांगितल्या आणि या चोरट्या पर्यटकांचे खरे रुप समोर आले.
ही घटना बालीतील उबुद येथील असून, हे भारतीय कुटुंब १६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या कुटुंबाने हॉटेलच्या रूममधील टॉवेल्स, हेअर ड्रायर, डोअर मॅट, टीव्ही रिमोट बॉक्स आणि चक्क भांडी सुद्धा आपल्या सुटकेसमध्ये भरली होती. चेक-आउटच्या वेळी संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पार्किंग एरियामध्येच या कुटुंबाच्या सुटकेस उघडायला लावून झडती घेतली, ज्यामध्ये हॉटेलचे मौल्यवान सामान सापडले.
माफी मागताना दिसले कुटुंबव्हायरल व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य हॉटेल कर्मचाऱ्यांची माफी मागताना आणि त्यांना जाऊ देण्याची विनंती करताना दिसत आहेत. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपले सामान परत घेतल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भारतीयांसाठी चर्चेचा आणि संतापाचा विषय बनला आहे.
Web Summary : An Indian family in Bali was caught stealing hotel items, including towels, a hairdryer, and even dishes. Hotel staff discovered the theft during checkout, leading to a public search of their luggage. The family apologized, but the incident sparked outrage and shame for Indians.
Web Summary : बाली में एक भारतीय परिवार होटल से तौलिये, हेयर ड्रायर और बर्तन जैसी चीजें चुराते पकड़ा गया। चेकआउट के दौरान होटल कर्मचारियों को चोरी का पता चला, जिसके बाद उनके सामान की तलाशी ली गई। परिवार ने माफी मांगी, लेकिन इस घटना से भारतीयों के लिए आक्रोश और शर्मिंदगी हुई।