शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

By योगेश पांडे | Updated: April 30, 2025 23:37 IST

अचानक पाहणी केल्यानंतर उघड झाली बाब

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उपराजधानीत हत्या, हल्ले यांचे प्रमाण वाढले असताना पोलिसांची नियमित गस्त व्हावी, अशी मागणी जोर धरते आहे; मात्र सायंकाळची गस्त टाळण्याचे प्रकार ठाणेदारांकडून घडत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सायंकाळची गस्त टाळणाऱ्या पारडी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना तेथे पोहोचून फटकारले. पोलिस आयुक्तांच्या अकस्मात भेटीमुळे खळबळ उडाली होती.

मंगळवारी रात्री ८ ते १० दरम्यान पोलिस आयुक्तांनी पारडी ठाण्याला भेट दिली. आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या बाहेर जाण्यास सांगून पायदळ पेट्रोलिंग, गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी जाऊन सराईत गुन्हेगारांची तपासणी आणि प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश देऊन रवाना केले. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्वतः पारडी बाजार, हनुमान मंदिर चौक, प्रजापती नगर या गर्दीच्या भागात प्रत्यक्ष पेट्रोलिंग केले.

पोलिस आयुक्त त्यानंतर सिम्बॉयसिस कॉलेज परिसराकडे गेले. प्रजापती मेट्रो स्टेशनजवळ काही तरुण टवाळखोरी करताना दिसून आले. त्यांना आयुक्तांनी स्वतः ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवले. त्यानंतर डॉ. सिंगल स्वतः पोलिस ताफ्यासह सिम्बॉयसिस कॉलेजच्या सुनसान परिसरात गेले. या परिसरात ड्रग्स, गांजा, धूम्रपान, मद्यपान करणारे व टवाळखोरी करणाऱ्यांविषयी तक्रारी त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अचानक पाहणी केली. अंधाऱ्या भागात काही लोक दारू पित होते. त्यांनादेखील पोलिस आयुक्तांनी ताब्यात घेतले. त्यात पीयूष देविदास क्षीरसागर (२४, प्रधानमंत्री आवास योजना), आदित्य विजय येनूरकर (२१, देवी नगर, वाठोडा), संतोष कुमार शारदा राम (देवीनगर, वाठोडा), नमन त्यागी (१९, सिम्बॉयसिस वसतिगृह), आर्यन रवी नेलवान (२१, सिम्बॉयसिस वसतिगृह), अंकित भोयर (२५, खापा, तुमसर, भंडारा) यांचा समावेश होता.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर