शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

कोकण,गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस धुवाधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 8:53 PM

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

ठळक मुद्देगुरुवारी राज्यात दिवसभरात महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद विदर्भात सर्व प्रमुख शहरात हलका पाऊस सुरुकोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदारचा पाऊस राहणार आहे.

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होण्याच्या दृष्टीने सध्या अनुकूल परिस्थिती आहे. कोकणात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. भिरा २००, माथेरान १६०, कल्याण १३०, जव्हार, तलासरी १२०, कर्जत, माणगाव, विक्रमगड ११०, सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर १००, अंबरनाथ, भिवंडी, चिपळूण, डहाणु, वाडा ९०, पोलादपूर ८०, दोडामार्ग, मंडणगड, म्हसाळा, मुरबाड, रोहा, शहापूर येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव, अम्बोणे २१०, दावडी, डोंगरवाडी १९०, लोणावळा १४०, खंद, वाणगाव, वळवण १२०, खोपोली ११०, भिवपुरी, ठाकूरवाडी ९०, कोयना, शिरोटा ८० मिमी पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी १५०, नवापूर १४०, महाबळेश्वर १३०, ओझरखेडा, राधानगरी, वेल्हे ९०, पेठ ८०, त्र्यंबकेश्वर ७०, हर्सुल, सुरगाणा ६०, पौड मुळशी ५० मिमी पाऊस पडला. याशिवाय सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला. विदर्भात कुरखेडा ८०, पौनी ६०, आमगाव, भिवापूर, कोरची, लाखंदूर, नागभीड, उमरेड येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी राज्यात दिवसभरात महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा ४१, नागपूर १५, गोंदिया १६, पुणे १०, नाशिक १५, सोलापूर व डहाणु येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली असून विदर्भात सर्व प्रमुख शहरात हलका पाऊस सुरु आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदारचा पाऊस राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यात १६ ऑगस्ट तर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात १५ व १६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी