शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 07:37 IST

Mumbai-Pune Expressway Mega Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलाचे काम आणि शटरींग काढण्यासाठी २३ आणि २४ एप्रिल रोजी दुपारी तीन तासांचा 'ट्रॅफिक ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या काळात दोन्ही दिशेकडील वाहतूक ठराविक वेळेत बंद ठेवून ती पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आज, २३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने किवळे देहूरोड, तळेगाव आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेला वळविण्यात येतील. त्यानंतर  उद्या, शुक्रवारी पुणे वाहिनीवरील पुलाचे शटरींग काढण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरही तीन तासांचा ब्लॉक असेल. हा ब्लॉक देखील  दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकदरम्यान, पुणे वाहिनीवरील वाहतूकही राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून वळवण्यात येईल.

प्रवाशांना आवाहन

दुपारच्या कडक उन्हात तीन तास वाहतूक वळवण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याची आणि प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway: Traffic Block Today and Tomorrow; Alternate Routes

Web Summary : Mumbai-Pune Expressway will have a three-hour traffic block on April 23rd and 24th, from 12 PM to 3 PM, for bridge work. Traffic will be diverted via alternate routes. Passengers are advised to plan accordingly due to potential delays.
टॅग्स :Mumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेTrafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र