Join us
Daily Top 2Weekly Top 5

वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 07:06 IST

हुतात्मा चौकातील फुटपाथवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ असलेल्या जुन्या पुस्तकांच्या बाजारात ५०-६० हजारांहून अधिक पुस्तके सध्या असून त्यात सातत्याने विविधांगी आणि बहुढंगी पुस्तकांची भरच पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हुतात्मा चौकातील फुटपाथवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ असलेल्या जुन्या पुस्तकांच्या बाजारात ५०-६० हजारांहून अधिक पुस्तके सध्या असून त्यात सातत्याने विविधांगी आणि बहुढंगी पुस्तकांची भरच पडत आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या १९५९ मध्ये प्रकाशित झालेल्या ययातीसारख्या दुर्मिळ, रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी, छावा, राऊ यांसारख्या ऐतिहासिक मराठी कादंबऱ्यापासून हिंदी साहित्य, इंग्रजी कादंबऱ्या आणि वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन यांसह उच्च शिक्षणाच्या विविध शाखांची पुस्तकेही या फुटपाथवर थाटलेल्या पुस्तक खजिन्यात आहेत. 

या फुटपाथवर १०-१२ पुस्तक विक्रेते असून राजेंद्र जयस्वाल हे त्यापैकीच एक. गेली ३२ वर्षे ते येथे व्यवसाय करीत असून त्याआधी काही वर्षांपासून अन्य विक्रेते तेथे आहेत. दररोज किमान ५०-१०० पुस्तकांची विक्री होते. नवीन पुस्तकांच्या तुलनेत येथे ५० ते ७० टक्के दरात किंवा त्याहूनही कमी दरात पुस्तके मिळत असल्याने विद्यार्थी, तरुण आणि सर्वच वयोगटातील वाचक येथे येतात. अगदी १०० रुपयांपासून वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन क्षेत्र आदींची महागडी पुस्तके दोन-तीन हजार रुपयांमध्ये विकली जातात. विद्यार्थ्यांना आम्ही थोडी अधिक सवलत देतो, असे जयस्वाल यांनी सांगितले. पाककला, कॉफीटेबल बुक, तरुणाईला आवडणाऱ्या इंग्रजी कादंबऱ्या, रेसिपी, व्यक्तिमत्त्वविकास आदी सर्वच क्षेत्रांतील पुस्तके येथे उपलब्ध आहेत. 

सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक विलियम डेलरिंपल यांचे ‘द ॲनार्कि ’ आणि ज्येष्ठ लेखिका सिमोन डी बोवॉयर यांचे ‘द सेकंड सेक्स ’, एरिक सिगल यांचे ‘द लवस्टोरी’ अशी गाजलेली इंग्रजी पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Old books from Khandekar to Beauvoir found on Hutatma Chowk footpath.

Web Summary : Mumbai's Hutatma Chowk footpath book market offers diverse, affordable books. From rare Marathi novels to English classics, books are available at discounted prices, attracting students and readers of all ages.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र