शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 07:21 IST

Nesco Drug Case: लिव्ह-इन पार्टनरसह तिघांना पोलिस कोठडी; महाराष्ट्र, गोवा ते गुजरातपर्यंत नशेचे जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: टिटवाळ्यातून अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलसह तिचा लिव्हिंग पार्टनर अमीर सय्यद आणि इरफान अन्सारीला बुधवारी न्यायालयाने २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबईसहमहाराष्ट्रातील अनेक शहरे तसेच गोवा-गुजरातपर्यंत अश्विनीकडून या ड्रग्जचे जाळे पसरल्याचा संशय आहे. तसेच आरोपीचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळ्यांशी कनेक्शन असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. हे ड्रग्ज एअर कार्गोद्वारे आल्याचा संशय असून, त्यानुसार तपास सुरू आहे.

याआधी अमीरला हेरॉईनच्या मोठ्या खेपेसह महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय) अटक केली होती. जामिनावर सुटताच त्याने पुन्हा अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू केली. मात्र, खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहिल्याने फेब्रुवारी महिन्यात त्याचा जामीन रद्द झाला, डीआरआयने त्याला पुन्हा कारागृहात कैद केले. जामिनावर असताना त्याने एक्स्टॅसीचा साठा अश्विनीकडे विक्रीसाठी पोच केला होता. ही माहिती उघड होताच मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने आमिरचा ताबा घेत त्याला अटक केली. हेरॉईन प्रकरणातून जामीन मिळवून बाहेर येताच आमिरने एक्स्टॅसीची मोठी खेप भारतात मागविली. त्यातून बराच साठा त्याने अश्विनीसोबत विकला असल्याचा संशय पथकाला आहे.

पुढील लिंकचा शोध सुरू

अश्विनी, अमीर, इरफान अन्सारीसह सुफियान शेखला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुफियानची रवानगी न्यायालयीन कोठडीत करीत अश्विनीसह अन्य तिघांना २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपीच्या पुढील लिंकचा शोध सुरू आहे. अश्विनीने मुंबईसह राज्यातच नाही तर परराज्यातही ड्रग्ज पुरवठा केल्याचा संशय आहे. यामध्ये मुंबईसह गोवा, गुजरातमध्येही पुरवठा केल्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.

अमीर दुबई रिटर्न

नेरुळला राहणारा अमीर यापूर्वी दुबईतही कामानिमित्त राहून आलेला आहे. २०२३ मध्ये तब्बल ११ किलो हेरॉईनसह(ब्राऊन शुगर) अटक होण्यापूर्वी आमिर नोकरीच्या बहाण्याने  अंमली पदार्थांचे वाहक(कॅरिअर) विविध देशांमध्ये पाठवत होता. त्यांच्या माध्यमातून तो अंमली पदार्थ भारतात आणायचा. जप्त केलेला साठा हाती पडण्याआधी आमिरने काही दिवस दुबईत वास्तव्यास होता, अशीही माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली असून, तपास सुरू आहे.

चोरट्या मार्गाने गोळ्या भारतात 

जप्त करण्यात आलेल्या पाच हजार एक्स्टॅसी  गोळ्यांचा साठा आरोपी आमिर याच्या मागणीनुसार आशिया खंडातील एका देशातून चोरट्या मार्गाने भारतात दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे. हे ड्रग्ज कोणत्या देशातून? कोणी व कोणत्या मार्गाने भारतात आणले ? आमिरने ती अश्विनीपर्यंत कसे पोच केली, या प्रवासात अन्य कोणी सहकार्य केले, याबाबत दोघांकडे कसून चौकशी सुरू आहे. पुढे या गोळ्यांची मागणीप्रमाणे विकण्याची जबाबदारी अश्विनी पार पाडत होती, अशी माहिती चौकशीतून पुढे आल्याचे समजते. याबाबत दोघांकडे कसून चौकशी आहे.

 जिया रिचेलचा फरार पेडलरशी संबंध

- नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अटक आरोपींची संख्या आता ११ झाली आहे. या प्रकरणात वनराई पोलिसांनी बुधवारी मोठी कारवाई करत उल्हासनगरमधून जिया जेकब रिचेल (३३) या महिलेला अटक केली. 

- तिचे फरार ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून तिच्या चौकशीत अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अटक आरोपींच्या बँक खात्यांची वनराई पोलिस कसून चौकशी करत आहेत. 

- आरोपी आयुष साहित्य, विनीत गेरेलानी आणि शुभ अगरवाल या आरोपींनी सुरक्षा रक्षक प्रदीप गुप्ता याला पैसे देऊन विनातिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक्स्टसी या ड्रग्सच्या गोळ्यांची विक्री केली. हे अंमली पदार्थ त्यांनी आनंद पटेलकडून आणले होते. 

- याच ड्रग्ज विक्रीतून मिळालेली रक्कम थेट जियाच्या बँक खात्यात जमा झाल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात जो सराईत ड्रग्ज पेडलर सध्या फरार आहे. त्याच्याशी जियाचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र जिया त्याची पत्नी नसून पेडलरच्या पत्नीच्याही बँक खात्यात ड्रग्ज विक्रीचा पैसा जमा झाल्याची माहिती आहे.

आरोपींना आज बोरिवली कोर्टात हजर करणार; प्रकरण कोणते वळण घेणार?

जियाला आज (२३ एप्रिल) बोरिवली मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तसेच आनंद पटेल (२४), विनीत गेरलानी (२२), शुभ अगरवाल (२२) आणि आयुष साहित्य (२४) यांचीही पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांनाही न्यायालयात सादर केले जाणार आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashwini Paul: Drug supplier's international links; smuggling via air cargo?

Web Summary : Drug supplier Ashwini Paul's international drug ring exposed; air cargo smuggling suspected. Arrested with partners, investigations reveal Goa-Gujarat connections. Earlier, accomplice Amir was arrested for heroin; now, ecstasy probe ongoing.
टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र