लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंतसह आघाडीच्या फलंदाजांनी गोलंदाजांच्या सर्वोत्तम कामगिरीवर पाणी फेरलं. नाणेफेक जिंकल्यावर राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी करायला लावत लखनौनं त्यांना अवघ्या १५९ धावांवर रोखत अर्ध लढाई जिंकली होती. घरच्या मैदानातील सामना जिंकून LSG चा संघ पुन्हा पटरीवर येईल, अशी अपेक्षा होती. पण अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना संघ ढेपाळला. रिषभ पंत, आयुष बडोनी आणि मार्करम शून्यावर बाद झाल्यावर निकोलस पूरन पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे लखनौचा संघ १८ षटकांतच ११९ धावांवर गारद झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पराभवानंतर LSG संघ मालक अन् कर्णधाराचा मैदानातील तो खास क्षण चर्चेत
यंदाच्या हंगामातील सातव्या सामन्यात सलग चौथ्या पराभवासह LSG चा संघ आता गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरला आहे. संघाच्या ढिसाळ कामगिरीनंतर संघ मालक संजीव गोयंका हे नेहमीच चर्चेत येतात. केएल राहुलसोबतच्या वादानंतर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या रिषभ पंतवरही त्यांनी राग काढल्याचे पाहायला मिळाले आहे. पण राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर जे चित्र दिसते ते चमत्कार वाटावे, असे होते. कारण पंत झिरो ठरला अन् संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असतानाही संघ मालक संजीव गोएंका यांनी राग न व्यक्त करता कर्णधाराला जादूची झप्पी दिल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर रिषभ पंत आणि संजीव गोयंका यांच्यातील तो खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
नकारात्मकतेचा विषय संपला, LSG संघ मालकाचा सकारात्मक अप्रोच दिसला
लखनौ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतरचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात संघ मालक संजीव गोयंका हे रिषभ पंतची गळाभेट घेताना दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य ते पराभवामुळे संघावर नाराज नाहीत, हे दाखवते. एवढेच नाही तर सामन्यात खातेही न उघडलेल्या पंतची पाठ थोपटत ते जे झालं ते विसरून पुढच्या सामन्याच्या तयारीला लागा, असे प्रोत्साहित करताना दिसून येते. याआधी नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत येणारे संघ मालक गोयंका यावेळी सकारात्मक भूमिकेत दिसले. ही गोष्ट अनेकांना थक्क करून सोडणारी आहे. संघ मालक कूल अंदाजात धीर दिल्यावर तरी LSG चा संघ पुढच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची बत्ती गुल करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Despite LSG's loss and Pant's zero score, owner Sanjiv Goenka showed support. After facing criticism for interactions with players, Goenka's positive gesture towards Pant is a talking point, contrasting past negativity. Will this boost LSG's performance?
Web Summary : एलएसजी की हार और पंत के शून्य पर आउट होने के बावजूद, मालिक संजीव गोयनका ने समर्थन दिखाया। खिलाड़ियों के साथ बातचीत के लिए आलोचना का सामना करने के बाद, गोयनका का पंत के प्रति सकारात्मक इशारा चर्चा का विषय है, जो पिछली नकारात्मकता के विपरीत है। क्या इससे एलएसजी के प्रदर्शन को बढ़ावा मिलेगा?