शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:38 IST

Maharashtra Employment: राज्यात २.५६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे १८ विशाल/अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे राज्यात एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात २.५६ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे १८ विशाल/अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याद्वारे राज्यात एक लाखाहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यातील विविध विभागांच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. 

विदर्भ, मराठवाडा, कोकणाच्या विकासाला चालना 

- या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल.

- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अनबलगन, एमआयडीसीचे सीईओ पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह बैठकीला उपस्थित होते.

जिल्हानिहाय गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती

शहर / जिल्हाकंपनीचे नावगुंतवणूक (कोटी रुपये)रोजगार निर्मिती
नाशिकव्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि.८०० कोटी५००
अमरावतीटॅंबो डिफेन्स प्रॉडक्ट प्रा. लि.१००० कोटी-
छ. संभाजीनगरनायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा.लि.१५०० कोटी१०००
शिरूर (पुणे)जबिल सर्किट इंडिया प्रा. लि.१५०० कोटी३०००
गडचिरोलीहरीओम पाईप इंडस्ट्रिज लि.३१३५ कोटी८०००
अहिल्यानगरनिबे स्पेस४००० कोटी१०००
तळेगाव, पुणेयुरोबॅस इंडिया प्रा.लि.४२०० कोटी१२,०००
चंद्रपूरमिलियन स्टील प्रा.लि.२५६ कोटी३६०
भंडाराअशोक लेलंड लि.१०,००० कोटी१०००
नागपूरअ‍ॅक्मे क्लिनटेक सोल्यूशन प्रा.लि.११,४०० कोटी७०००
पालघर आणि रायगडअ‍ॅक्मे क्लिनटेक सोल्यूशन प्रा.लि.११,००० कोटी२५००
नागपूरसोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लि.१२,७८० कोटी६८२५
अहिल्यानगर आणि धाराशिवग्लोब फोर्ज लि.१५,४३० कोटी३६००
रायगडबालासोर अलॉयज१७,४७९ कोटी३२००
छ. संभाजीनगरगोदावरी न्यू एनर्जी प्रा.लि.२७,५१५ कोटी४०००
रायगड आणि पालघरअ‍ॅक्मे क्लिनटेक प्रा.लि.३७,८०० कोटी४५००
गडचिरोलीरश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि.४०,००० कोटी२०,०००
गडचिरोलीएस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन लि.५८,८५२ कोटी२५,०००
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to see ₹2.56 lakh crore investment, jobs boost.

Web Summary : Maharashtra approves ₹2.56 lakh crore investment in 18 projects, creating over one lakh jobs. Focus on industrial development in Vidarbha, Marathwada, and Konkan regions, benefiting local economies, MSMEs, and skill development.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारjobनोकरी