By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:34 IST
1 / 8Success Story Zerodha Nikhil Kamath: भारतातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज कंपनी 'झिरोदा'चे (Zerodha) सह-संस्थापक निखिल कामथ यांची यशोगाथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मोठं यश मिळवण्यासाठी मोठी पदवी आणि उच्च शिक्षण आवश्यक असते, असा जगाचा समज असताना निखिल कामथ यांनी वयाच्या १५-१६ व्या वर्षी १० वी सोडून यशाचं नवं शिखर गाठलं. त्यांच्या या प्रवासामागे त्यांच्या पालकांचं अनोखं संगोपन आणि चौकटीबाहेरच्या नियमांचा मोठा वाटा आहे.2 / 8१९८६ मध्ये कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निखिल कामथ यांचं मन कधीही पुस्तकात आणि अभ्यासात रमलं नाही. त्यांना शाळा आवडत नव्हती, असं त्यांनी स्वतः कबूल केलं आहे. मात्र, त्यांच्या पालकांनी त्यांना पारंपारिक शिक्षणासाठी सक्ती करण्याऐवजी त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला वाव दिला.3 / 8निखिल कामथ यांच्या उद्योजक प्रवासाची सुरुवात वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी झाली होती. ९ वीत असताना त्यांनी एका मित्रासोबत जुने मोबाईल फोन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नफा चांगला होत होता, पण जेव्हा त्यांच्या आईला हे कळाले तेव्हा त्यांनी रागाच्या भरात सर्व फोन टॉयलेटमध्ये फ्लश केले. या घटनेने त्यांचा उत्साह कमी झाला नाही, तर त्यांना जोखीम घेण्यास आणि अपयशातून शिकण्यास अधिक प्रेरित केलं.4 / 8निखिल कामथ यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, २००० च्या सुरुवातीला त्यांनी बंगळुरूमधील एका कॉल सेंटरमध्ये पहिली नोकरी सुरू केली होती. त्यावेळी त्यांना वर्षाला सुमारे ८८,००० रुपये (म्हणजेच महिन्याला ७,००० ते ८,००० रुपये) मिळत होते. ते रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायचे. या नोकरीनं त्यांना शिस्त आणि कामाची समज शिकवली, जी पुढे झिरोदासारखी मोठी कंपनी उभारताना कामी आली.5 / 8त्यांच्या घरात प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य होतं. एखादी गोष्ट यशस्वी झाली नाही, तर तो शेवट नसून एक धडा मानला जायचा, असं निखिल कामत यांनी सांगितलं होतं. निखिल यांनी १५-१६ व्या वर्षी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पालकांनी दबाव न आणता त्यांना स्वतःचा मार्ग निवडू दिला. १० वी सोडल्यानंतर त्यांनी कॉल सेंटरमध्ये काम करताना रिकाम्या वेळेत स्टॉक ट्रेडिंग शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्या पालकांनी शैक्षणिक यश हेच यशाचं एकमेव परिमाण कधीही मानलं नाही.6 / 8निखिल कामथ यांचं असं मत आहे की, त्यांचे यश पुस्तकांमुळे नाही तर जीवनातील अनुभव आणि चुकांमधून आलं आहे. त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन सक्तीच्या आज्ञाधारकपणापेक्षा स्वातंत्र्याला महत्त्व देणारा होता.7 / 8निखिल यांनी त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत मिळून २०१० मध्ये 'झिरोदा'चा पाया रचला. त्यांच्या धोरणात्मक दूरदृष्टीनं भारताच्या ब्रोकरेज क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी डिस्काउंट ब्रोकरेज मॉडेल आणलं, ज्यामुळे सामान्य लोकांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणं सोपं आणि स्वस्त झालं. 8 / 8फोर्ब्सच्या मते, निखिल कामथ यांची नेटवर्थ २.५ अब्ज डॉलर (सुमारे २३ हजार कोटी रुपये) आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' अब्जाधीशांपैकी एक आहेत.