शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:10 IST

भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने खासगी स्कूल बसला पाठीमागून जोरात धडक दिली.

राजस्थानमधील बाडमेर येथे एक भीषण अपघात झाला आहे. बायतू भागात भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने खासगी स्कूल बसला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा स्कूल बस रस्त्याच्या कडेला उभी होती आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यासाठी थांबली होती. बसमध्ये २४ मुलं होती. बायतू-जोधपूर चौकाजवळ सकाळी हा अपघात घडला. धडकेमुळे बसच्या मागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून १० मुलं जखमी झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या बायतू रुग्णालयात दाखल केलं.

९ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

जखमी झालेल्या मुलांपैकी ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर जोधपूर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या मुलांना फ्रॅक्चर आणि गंभीर जखमा झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

अपघाताची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात गर्दी केली. आपल्या मुलांची अवस्था पाहून पालकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पाहायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजपा नेते बालाराम मूंढ यांनीही रुग्णालय आणि घटनास्थळाला भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

तपासाला सुरुवात

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रकचा अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा हेच या अपघाताचं मुख्य कारण असल्याचं मानलं जात आहे. यासोबतच पोलीस स्कूल बसचे फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आणि ड्रायव्हरच्या कागदपत्रांचीही कसून चौकशी करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan: School bus-truck collision injures 10 students seriously in Barmer

Web Summary : A speeding truck collided with a school bus in Barmer, Rajasthan, injuring ten students. Nine are critical and moved to Jodhpur. The accident occurred near Baytu, causing significant damage to the bus. Police are investigating the cause.
टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी