परतवाडा येथील तरुणींच्या लैंगिक शोषणाचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी आज अचलपूरच्या समरसपुरा पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी त्याची भररस्त्यातून धिंड काढली. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
आरोपी अयान अहमद याला अचलपूर शहराच्या मुख्य भागातून फिरवत त्याची धिंड काढण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
मित्रांकडे लपवलेल्या वस्तूंचा शोधतपासादरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, अयान अहमद याने त्याच्या एका मित्राकडे काही संशयास्पद वस्तू ठेवल्या होत्या. या वस्तू नेमक्या काय आहेत (मोबाईल, मेमरी कार्ड किंवा इतर पुरावे), याचा शोध पोलीस घेत आहेत.
समरसपुरा पोलिसांची कारवाईअचलपूरच्या समरसपुरा पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचे सहकार्य लाभले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
Web Summary : Ayan Ahmed, the prime accused in the Amravati sexual assault case involving viral videos, was paraded by police in Achalpur. Police are searching for hidden evidence, including devices, with the help of Ahmed's friends. Samaspura police are investigating the case thoroughly, looking for accomplices.
Web Summary : अमरावती यौन शोषण मामले में मुख्य आरोपी अयान अहमद को पुलिस ने अचलपुर में परेड कराई। वायरल वीडियो से जुड़े इस मामले में पुलिस अहमद के दोस्तों की मदद से छिपे हुए सबूतों, उपकरणों की तलाश कर रही है। समसपुरा पुलिस मामले की गहन जांच कर रही है और साथियों की तलाश जारी है।