तेहरान: एकीकडे अमेरिका आणि इराण युद्धात पाकिस्तान मध्यस्थीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाकिस्तानातूनइराणच्या सीमेवर दहशतवादी घुसविण्यात आले आहेत. सतर्क असलेल्या इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील रास्क भागात इराणी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. इराणमध्ये घुसखोरी करणाऱ्या 'जैश अल-अदल' या दहशतवादी संघटनेची एक संपूर्ण ऑपरेशनल टीम या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली.
ही घटना इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात घडली. इराणची अधिकृत मीडिया 'तसनीम'ने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी पाकिस्तानची सीमा ओलांडून रास्क परिसरात घुसले होते. या चकमकीनंतर इराणी सैन्याने घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पाकिस्तान अमेरिकेची दलाली करत असल्याने आधीच इराण संतापलेला आहे. आता या घुसखोरीमुळे इराण आणि पाकिस्तानमधील तणावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे 'जैश अल-अदल'?हा एक बलुच सुन्नी दहशतवादी गट असून २०१२ पासून इराण-पाकिस्तान सीमेवर सक्रिय आहे. अरबी भाषेत याचा अर्थ 'न्यायची सेना' असा होतो. हा गट इराणमधील सुन्नी बलुच समुदायाच्या हक्कासाठी लढत असल्याचा दावा करतो. तथापि, इराण आणि इतर अनेक देशांनी याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा गट प्रामुख्याने इराणी पोलीस आणि इस्रायलच्या विरोधात लढणाऱ्या IRGC च्या ठिकाणांना लक्ष्य करतो.
भौगोलिक प्रभावया संघटनेच्या हालचाली प्रामुख्याने इराणचा दक्षिण-पूर्व भाग, पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात आहेत. या दुर्गम भागाचा फायदा घेऊन हे दहशतवादी सातत्याने हल्ले आणि घुसखोरी करत असतात.
Web Summary : Terrorists from Pakistan infiltrated Iran near Rask, leading to a clash. Iranian forces killed 12 militants from Jaish al-Adl. Tensions escalate amid existing strain between Iran and Pakistan. The group targets Iranian police and IRGC.
Web Summary : पाकिस्तान से आतंकवादी ईरान में घुसे, रास्क सीमा पर मुठभेड़ हुई। ईरानी बलों ने जैश अल-अदल के 12 आतंकवादियों को मार गिराया। ईरान और पाकिस्तान के बीच तनाव बढ़ने की आशंका है। यह समूह ईरानी पुलिस और आईआरजीसी को निशाना बनाता है।