गुजरातच्या वडोदरामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा भयंकर कट रचला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. १५ एप्रिलच्या रात्री पानाची टपरी चालवणारा गिरीश पटेल याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश रात्री घरी परतत असताना काही लोकांनी त्यांचं अपहरण केलं. आरोपींनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं, चाकूचा धाक दाखवला आणि अनेक ठिकाणी फिरवल्यानंतर सोजीत्रा येथील एका कालव्यात फेकून दिलं. हल्लेखोरांना वाटलं की, गिरीशचा मृत्यू झाला आहे आणि ते तिथून पसार झाले. मात्र या गोष्टीत एक ट्विस्ट आला.
कालव्यात फेकल्यानंतरही गिरीशने धीर सोडला नाही. पाण्याचा प्रवाह वाहत असताना त्याने एका ठिकाणी घट्ट पकडून ठेवलं. तब्बल तीन तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तो कसाबसा बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि त्याचा जीव वाचला. यानंतर त्याने थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सुरुवातीला पाच संशयितांना ताब्यात घेतलं, त्यानंतर या कटाचा उलगडा झाला.
तपासात असं दिसून आलं की, गिरीशची पत्नी फाल्गुनी पटेल हिचे खेडा येथील सलून चालक कौशिक शर्मा याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी गिरीशला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला होता. कौशिक शर्माने नरेंद्र उर्फ निकुल गोस्वामी नावाच्या व्यक्तीला ३५,००० रुपयांची सुपारी दिली होती. कॉल रेकॉर्ड्समधून समोर आलं की, घटनेपूर्वी फाल्गुनी आणि कौशिक यांच्यात सतत संवाद सुरू होता. दोघांनी केवळ दोन दिवसांत १०० पेक्षा जास्त वेळा एकमेकांना फोन केले होते.
अपहरणादरम्यान आरोपींनी गिरीशकडील रोख रक्कम आणि एटीएम कार्डही घेतलं. मात्र आपली ओळख पटेल या भीतीने त्यांनी कार्डचा वापर केला नाही. पोलिसांनी या प्रकरणी कौशिक शर्मा, जितेंद्र बारिया, उमंग प्रजापती, उमंग भोई, पृथ्वी भोई आणि फाल्गुनी पटेल यांना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Gujarat, a wife conspired with her lover to kill her husband. The husband was kidnapped, attacked, and thrown into a canal, but miraculously survived. Police arrested the wife and five others involved in the murder plot.
Web Summary : गुजरात में, एक पत्नी ने अपने प्रेमी के साथ मिलकर अपने पति को मारने की साजिश रची। पति का अपहरण कर लिया गया, हमला किया गया और एक नहर में फेंक दिया गया, लेकिन चमत्कारिक ढंग से वह बच गया। पुलिस ने पत्नी और हत्या की साजिश में शामिल पांच अन्य लोगों को गिरफ्तार किया।