Amravati Achalpur Paratwada viral video: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बहुचर्चित न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपी उजेर खान (२०, रा. अचलपूर) याला ऑक्टोबर २०२५ मध्ये पीडितेच्या पालकांनी बोलावून समज दिली होती. माझ्या मुलीशी बोलणे आणि मेसेज करणे बंद कर, अन्यथा पोलिस तक्रार करू, अशी ताकीद दिली असता, माझे करिअर खराब होईल, मला माफ करा, असे म्हणत त्याने त्यावेळी नमते घेतले होते, असे उघड झाले आहे.
आधीच पोलीस कोठडीत असलेल्या उजेर खान याच्याविरुद्ध १९ एप्रिल रोजी एका १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळवणुकीच्या उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी विनयभंग आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ वर्षाच्या मुलीने दिली तक्रार
१४ एप्रिल रोजी उजेर खान याला अयान अहमदच्या मोबाईलमधील खासगी व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो सध्या २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे. मात्र, याच दरम्यान परतवाडा येथील एका १६ वर्षीय मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
तक्रारीनुसार, उजेर खान हा संबंधित पीडित मुलगी शिकवणी वर्गाला जात असताना तिचा लैंगिक छळ करण्याच्या उद्देशाने पाठलाग करत होता. १३ एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर परतवाडा पोलिस नव्या गुन्ह्यात त्याला अटक करण्याची शक्यता आहे.
आरोपी उजेर खान याने अयान अहमद याचा मोबाईलमधील न्युड व्हिडीओ व फोटो चोरून ते स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतले होते. त्यानंतर अयान याच्याशी वाद झाल्याने त्याने ते व्हिडीओ आपल्या पाच मित्रांना फॉरवर्ड केले होते. ते व्हायरल होताच अख्ख्या महाराष्ट्रात मोठा गहजब उडाला होता. ते पाचजणही पोलिसांच्या अटकेत आहेत.
फेब्रुवारीपासून पुन्हा छळ सुरू
ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत शांत राहिलेल्या उजेर खान याने फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा पीडितेचा पाठलाग सुरू केला. तो तिला वारंवार कॉल आणि मेसेज करून त्रास देऊ लागला. आरोपीच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने १८ एप्रिल रोजी सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
ज्यावरून हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिडिता ही १६ वर्षे नऊ महिने वयाची आहे. आरोपी उजेर खान हा सप्टेंबर २०२५ मध्ये त्या मुलीच्या संपर्कात आला. तो त्या मुलीला फोन व मेसेजदेखील करत होता. ती बाब लक्षात आल्याने तिच्या पालकांनी त्याला एका ठिकाणी बोलावून सक्त ताकिद दिली होती. पण, त्याने माफी मागून परत त्रास देणे सुरू केले.
Web Summary : Accused Ujer Khan, arrested in a nude video case, faces fresh charges for harassing a 16-year-old. He resumed stalking and messaging her despite earlier warnings from her parents. The teen finally reported him.
Web Summary : न्यूड वीडियो मामले में गिरफ्तार आरोपी उजेर खान पर 16 वर्षीय लड़की को परेशान करने के नए आरोप लगे हैं। माता-पिता की चेतावनी के बावजूद उसने उसका पीछा करना और मैसेज करना जारी रखा। आखिरकार लड़की ने उसकी शिकायत की।