नवी दिल्ली - भारतात ऑनलाइन गेमिंगबाबत मोठा बदल होणार आहे. ज्यासाठी १ मे पासून नवीन नियम लागू होतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या नव्या नियमांची अधिसूचना जारी केली आहे. आता ऑनलाइन गेमिंग अथॉरिटीचा मार्ग मोकळा झाला असून प्रमोशन एँन्ड रेगुलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग एक्ट लागू करण्यासाठी मदत मिळणार आहे.
याबाबत आयटी सचिव एस कृष्णन यांनी म्हटलं की, बहुतांश ऑनलाइन गेमला रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासणार नाही. रियल मनी गेम आधीपासून निर्बंधित केले गेले आहेत. त्यामुळे ऑनलाइन गेमिंगची नोंदणी करणे आवश्यक नाही. देखरेख केवळ विशेष परिस्थितीतच लागू केली जाईल. मूळ कायद्यानुसार ई-स्पोर्ट्स खेळांना नोंदणी करणे बंधनकारक राहील. नवीन नियमांनुसार भारतात ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन गेमिंगला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खऱ्या पैशांच्या ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच संपूर्ण प्रणाली शक्य तितकी सुलभ ठेवली जाईल. ज्या खेळांमध्ये पैशांचा संबंध नाही अशा बहुतांश खेळांना नोंदणीशिवाय चालवण्याची परवानगी दिली पाहिजे. मात्र त्यांची इच्छा असल्यास ते स्वतःची नोंदणी करू शकतात, जी एक पूर्णपणे ऐच्छिक प्रक्रिया असेल असं आयटी सचिव एस कृष्णन यांनी म्हटलं.
गेमची विभागणी ३ अटींवर केली जाईल
पहिल्या स्थितीत अथॉरिटी स्वत: यावर निर्णय घेऊ शकते.
दुसऱ्या स्थितीत ईस्पोर्ट्स गेम्सशी निगडित असेल
तिसऱ्या स्थितीत केंद्र सरकार कुठल्याही स्पेशल कॅटेगिरीच्या सोशल गेम्सला अधिसूचित करू शकते
कोणावर असणार बंदी?
रियल मनी गेम्सवर आधीपासून बंदी आहे. त्यावर आणखी कठोर निर्बंध लादले जातील
ईस्पोर्ट्सला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असेल
यूजर्सला काय होईल फायदा?
१ मे पासून नवीन नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल तेव्हा युजर्सला अनेक फायदे होतील. युजर्सला आणखी सुरक्षा मिळेल. मागील वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये मंत्रालयाने या नियमांवर फिडबॅक मागितले होते. ज्यानंतर जवळपास २५०० सूचना मंत्रालयाला प्राप्त झाल्या होत्या.
Web Summary : From May 1st, new Indian online gaming rules take effect. Most games won't need registration, but real money games face restrictions. E-sports require registration. The goal is user safety and promoting e-sports.
Web Summary : 1 मई से, भारत में ऑनलाइन गेमिंग के नए नियम लागू। ज्यादातर गेम्स को रजिस्ट्रेशन की जरूरत नहीं, पर रियल मनी गेम्स पर प्रतिबंध। ई-स्पोर्ट्स के लिए रजिस्ट्रेशन जरूरी। लक्ष्य है यूजर सुरक्षा और ई-स्पोर्ट्स को बढ़ावा देना।