शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:20 IST

Iran-US Tensions: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली.

दुबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत वाढविल्याची घोषणा केली असली तरी त्यावर आपला विश्वास नसल्याची भूमिका इराणने कायम ठेवली आहे.  इराणने बुधवारीही आपले आक्रमक धोरण कायम ठेवत होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार केला. त्यातील दोन जहाजे जप्त केली असून, त्यातील जहाज भारताकडे येणार होते. सागरी हद्दीविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच या जहाजांवर कारवाई करण्यात आल्याचे समर्थन इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डने (आयआरजीसी) केले आहे. या घटनांमुळे युद्धातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे कायमस्वरूपी प्रतिनिधी अमीर सईद इरावानी यांनी सांगितले की, नाकेबंदी हटविल्यानंतरच अमेरिकेसोबत चर्चा होऊ शकते.

वाटाघाटींमधील अडथळा 

इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी बसण्यापूर्वी अमेरिकेने नौदल नाकेबंदी उठवावी, अशी अट इराणने ठेवली आहे. जोपर्यंत नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत युद्धविरामाला काहीही अर्थ नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे.  

जहाजाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये छेडछाड; सागरी सुरक्षेला धोका

आयआरजीसीने दिलेल्या माहितीनुसार लायबेरियाच्या ध्वजाखालील एपामिनॉण्डस हे कंटेनर जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे जात होते. इराणी नौदलाने दावा केला आहे, की या जहाजाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये छेडछाड झाली होती, ज्यामुळे आमच्या क्षेत्रातील सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर आयआरजीसीने ते जहाज रोखून ताब्यात घेतले किनाऱ्याकडे नेले. याशिवाय फ्रान्सिस्का नावाचे इस्रायलशी संबंधित जहाजही इराणने ताब्यात घेतले आहे. तसेच युफोरिया नावाच्या जहाजावर हल्ला केला.

जहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी इराणला पैसे दिलेले नाहीत

भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी इराणला रोख रक्कम किंवा क्रिप्टोकरन्सी स्वरुपात पैसे दिले नसल्याचे भारताने बुधवारी स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय? इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत युद्धविराम कायम राहील

-  अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणला दररोज सुमारे ४७०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्या देशाच्या सैनिक आणि पोलिसांना वेळेवर वेतन मिळत नाही. परिणामी, देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. 

- आर्थिक दुरवस्थेमुळे इराणमध्ये देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत आहे. इराणकडे आता पैशांची कमतरता आहे, त्यामुळे तो तत्काळ होर्मुझ सामुद्रधुनी खुली करू इच्छितो. इराणवर दबाव कायम ठेवण्यासाठी नाकेबंदी सुरूच राहील, असेही ट्रम्प म्हणाले.

- डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम राहील. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी मंगळवारी अमेरिकी राजदूत नताली बेकर यांची भेट घेऊन युद्धविराम वाढविण्याची विनंती केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran distrusts Trump's ceasefire extension, demands lifting of US blockade.

Web Summary : Despite Trump's ceasefire extension, Iran demands US lift naval blockade for talks. Iran seized ships, alleging navigation violations. Trump claims Iran faces economic crisis due to blockade, but ceasefire continues until Iran offers a proposal.
टॅग्स :Warयुद्धAmericaअमेरिकाIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प