शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 00:18 IST

अमेरिका-इराण तणाव: ट्रम्प यांची करारासाठी बेचैनी, तर इराणची IRGC युद्धाच्या तयारीत. होर्मुझ सामुद्रधुनी खाली करण्याचे इराणचे अल्टिमेटम.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणसोबतच्या करारासाठी आग्रही असताना, इराणची शक्तिशाली लष्करी संघटना 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोर' मात्र युद्ध करण्याच्या मनस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेल्या कट्टरवादी नेतृत्वामुळे इराण आता झुकण्याच्या पवित्र्यात नाही, तर थेट आव्हानाच्या भूमिकेत आहे.

ट्रम्प यांची बेचैनी आणि इराणचा उपरोध

गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेल्या बॉम्बफेकीनंतरही अमेरिकेला आपले उद्दिष्ट गाठता आलेले नाही. उलट, ट्रम्प यांनी लादलेल्या आर्थिक नाकाबंदीचा इराणवर फारसा परिणाम झालेला नाही. यामुळे आता ट्रम्प यांना युद्धातून बाहेर पडण्यासाठी एका 'डील'ची घाई झाली आहे. याच कारणास्तव, ट्रम्प यांनी युद्धविरामाची मुदत पाच दिवसांनी एकतर्फी वाढवली आहे. ट्रम्प यांच्या या 'यू-टर्न'वर इराणने जोरदार टीका केली असून, त्यांच्या अधिकृत मीडियाने ४० सेकंदांचा एआय व्हिडिओ जारी करून ट्रम्प यांच्या या घाईची थट्टा उडवली आहे.

IRGCची अट: नाकाबंदी उठवा, तरच चर्चा!

इराणच्या धोरणांवर आता पूर्णपणे IRGC चा ताबा आहे. अमेरिकेने नाकाबंदी उठवावी, होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण मान्य करावे आणि अमेरिकेने जप्त केलेला इराणचा जहाज परत करावा, तरच चर्चेचा विचार होईल, अशी कठोर अट इराणने घातली आहे. IRGC ने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जर पुन्हा हल्ला झाला, तर अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल जे अमेरिका कधीच विसरणार नाही.

खाडी देशांना धोक्याचा इशारा

इराणने आता थेट अरब राष्ट्रांनाही इशारा दिला आहे. जर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत, बहरीन आणि कतारने अमेरिकेला आपल्या एअरस्पेसचा वापर करू दिला, तर इराण या देशांमधील तेल प्रकल्पांवर आणि लष्करी तळांवर विध्वंसक हल्ले करेल. होर्मुज सामुद्रधुनीजवळील जहाज आणि परदेशी नागरिकांनी हा भाग त्वरित खाली करावा, असे स्पष्ट फर्मानच इराणने काढले आहे.

युद्ध पेटल्यास इस्रायलचा 'वॉ वॉर प्लॅन' तयार

दुसरीकडे, इस्रायलनेही युद्ध सुरू करण्याची पूर्ण तयारी केली असून, त्यांना फक्त अमेरिकेच्या 'ग्रीन सिग्नल'ची प्रतीक्षा आहे. नेतन्याहू सरकारने इराणच्या भूगर्भातील मिसाइल तळ, न्यूक्लियर साइट्स आणि IRGCच्या कमांड सेंटर्सना लक्ष्य करण्यासाठी 'राउंड-२'चा प्लॅन तयार ठेवला आहे. थोडक्यात सांगायचे तर, एका बाजूला ट्रम्प चर्चेच्या टेबलावर बसण्यासाठी आसुसलेले असताना, दुसऱ्या बाजूला इराणने बारूदचा साठा तयार ठेवला आहे. मध्यपूर्वेतील हा तणाव आता कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Hardens Stance, Threatens Middle East Peace Deal, War Looms.

Web Summary : US-Iran tensions escalate as Iran's IRGC demands lifting sanctions for talks. Threats to regional countries aiding the US, and Israel prepares for action. Middle East peace deal jeopardized.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प