शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:20 IST

कल्याणमधील बाजारपेठ पोलिस त्यांच्या तक्रारीला दाद देत नसल्याचा आरोप मुदलीयार यांनी केली आहे.

कल्याण : कल्याणमधील रहिवासी विजय मुदलीयार यांना एक लिंक पाठवून त्याद्वारे त्यांची ७० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईनला कळविले. हेल्पलाईनला त्यांची तक्राराची दखल घेतली गेली. मात्र कल्याणमधील बाजारपेठ पोलिस त्यांच्या तक्रारीला दाद देत नसल्याचा आरोप मुदलीयार यांनी केली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक फसवणूकीमुळे हतबल झालेल्या मुदिलीयार यांनी आत्ता कोणाकडे दाद मागायची असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. 

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात राहणारे मुदलीयार हे खाजगी नोकरी करतात. त्यांना ७ एप्रिल रोजी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितले की, त्यांच्या क्रेडीड कार्ड संदर्भात काही तरी इश्यू झाला आहे. त्याकरीता एक लिंक पाठवितो. ती लिंक तूम्ही ओपन करा. त्यानंतर तुमची समस्या दूर होईल. मुदलीयार यांनी ती लिंक ओपन केली. त्यानंतर १० एप्रिलला त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बँकेतील खात्यातून १२ वेळा आर्थिक व्यवहार केला गेला. त्यांच्या खात्यातून १२ वेळा ३ हजार ५९९ रुपये काढले गेले आहे. 

ही रक्कम जवळपास ४३ हजार रुपये इतकी होते. हा व्यवहार उत्तर प्रदेशातील नोयेडा येथील रिलायन्स डिजिटलमधून करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, १६ एप्रिलपर्यंत त्यांचा सुरु असलेला मोबाईल नंबर हा अनाचक पोर्ट करण्यात आला आहे. त्यांचा नंबर ही बंद दाखवित होता. या प्रकरणी त्यांनी जिओ आणि एअरटेल कंपनीच्या गॅलरीत जाऊन चौकशी केली. दोन्ही कंपनीच्या गॅलरीतून त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांच्या सॅलरी अकाऊंटमधूही १८ हजार आणि दुसऱ्या एका अकाऊंटमधून १० हजार रुपये काढून त्यांची जवळपास एकूण ७० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 

त्यांना ज्या नंबरहून फोन आला होता तो नंबर झारखंडचा आहे. हा सगळा फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच मुदलीयार यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधला. त्याठिकाणी त्यांच्या तक्राराची दखल घेतली गेली. मात्र मुदलीयार हे कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात गेले असता त्यांनी पोलिसांनी सांगितले की, हेल्पलाईनहून आम्हाला काही माहिती मिळालेली नाही अशी बोळवण केली. त्यामुळे आत्ता आमच्या फसवणूकी संदर्भात आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ?असा संतप्त सवाल मुदलीयार यांनी उपस्थित केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan: Cybercrime of ₹70,000; Helpline Complaint Unheeded, Frustrated Victim

Web Summary : Kalyan resident Vijay Mudliyar lost ₹70,000 in a cyber fraud. Despite reporting to the national helpline, local police allegedly ignored his complaint, leaving him helpless and questioning where to seek justice.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम