शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:41 IST

1 / 6
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम केवळ कच्च्या तेलाच्या किमतींपुरताच मर्यादित नाही, तर इतरही अनेक गोष्टीवर होताना दिसत आहे. या युद्धाची झळ आता थेट कंडोम उत्पादनापर्यंत पोहोचली आहे.
2 / 6
जगातील सर्वात मोठी कंडोम उत्पादक कंपनी 'कॅरेक्स'ने (Karex) आपल्या उत्पादनांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
3 / 6
यासंदर्भात 'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियन कंपनी कॅरेक्स दरवर्षी ५ अब्जांहून अधिक कंडोमची निर्मिती करते. ड्युरेक्स, ट्रोजन यांसारख्या मोठ्या ब्रँड्ससह ब्रिटनची 'NHS' आणि संयुक्त राष्ट्रांच्या एड्स कार्यक्रमांनाही ही कंपनी पुरवठा करते.
4 / 6
काय म्हणते कंपनी - यासंदर्भात रॉयटर्सशी बोलताना, कंपनीचे सीईओ गोह मिया कियात म्हणाले, 'फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाल्यापासून उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकाची किंमत वाढली आहे. सिंथेटिक रबर, नायट्रिल, पॅकेजिंग मटेरियल, ॲल्युमिनियम फॉइल्स आणि सिलिकॉन ऑइल यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्याशिवाय कंपनीकडे दुसरा पर्याय नाही.'
5 / 6
शिपिंगच्या समस्येने परिस्थिती बिकट -- शिपिंगच्या समस्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पूर्वी युरोप आणि अमेरिकेत पोहोचणाऱ्या शिपमेंटला आता दुप्पट वेळ लागत आहे. मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने आणि स्टॉक कमी झाल्याने जागतिक स्तरावर कंडोमची मागणी ३० टक्क्यांनी वाढली आहे.
6 / 6
दरम्यान, आपल्याकडे पुढील काही महिन्यांसाठी पुरेसा साठा असला तरी, वाढती मागणी लक्षात घेत, उत्पादन वाढवण्याचा विचार सुरू आहे. कच्च्या मालाचे दर आणि शिपिंगमधील अडथळे लवकर दूर होण्याची शक्यता नाही, असेही कॅरेक्सने म्हटले आहे.
टॅग्स :businessव्यवसायIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध