शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 06:56 IST

चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून तथाकथित ‘बाबा’कडून अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर (जि. अकोला): तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेचे थरारक वास्तव उघड करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, यात  चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून तथाकथित ‘बाबा’कडून अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे; मात्र हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. 

घोर अंधश्रद्धेतून लहान मुलांवर जीवघेणे ‘प्रयोग’   

निंभा गावात काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लहान मुलांवर जीवघेणे प्रयोग करत असल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुकल्यावर अत्यंत धोकादायक आणि अघोरी पद्धतीने उपचार केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांकडून फक्त समज

- या प्रकरणाची दखल घेत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर जी. गुठ्ठे यांनी संबंधित व्यक्तींना १६ एप्रिल रोजी नोटीस बजावली. त्यामध्ये निंभा येथील ‘बैरम बुवा’ संस्थानात धार्मिक विधीच्या नावाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

- या कार्यक्रमादरम्यान दैवी शक्ती, चमत्कार, अघोरी प्रथा किंवा भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत अशा कृत्यांना मनाई असून, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच संबंधितांना ठाणेदार गुठ्ठे यांच्यासमक्ष समज देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Akola: Child subjected to horrifying ritual; video sparks outrage.

Web Summary : A video from Akola shows a child undergoing a dangerous ritual. Police claim the video is old and have issued warnings against superstition, but the incident highlights ongoing concerns about harmful practices.
टॅग्स :AkolaअकोलाViral Videoव्हायरल व्हिडिओMaharashtraमहाराष्ट्र