शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:55 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी सुरू असलेला युद्धविराम बेमुदत काळासाठी वाढविण्याची घोषणा केली. इराणचे नेतृत्व ‘गंभीरपणे विभागलेले’ असल्याने वाटाघाटींसाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी सुरू असलेला युद्धविराम बेमुदत काळासाठी वाढविण्याची घोषणा केली. इराणचे नेतृत्व ‘गंभीरपणे विभागलेले’ असल्याने वाटाघाटींसाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जग युद्ध समाप्तीची प्रतीक्षा करीत असताना झालेल्या या घोषणेचा आनंद क्षणभंगुर आहे; कारण होर्मुझ सामुद्रधुनीनजीकच्या इराणी बंदरांची अमेरिकन नाकेबंदी कायमच राहाणार आहे. युद्धविराम आणि नाकेबंदी एकाचवेळी सुरू ठेवणे, हा स्पष्ट अंतर्विरोध आहे. शस्त्रे म्यान असतील; पण जगाची गळचेपी मात्र सुरूच राहील ! ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा चमूने इराणला काही प्राथमिक मुद्द्यांवर आगाऊ सहमती दर्शवण्यास सांगितले होते; परंतु दिवस उलटत गेले तरी इराणकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स पाकिस्तानला दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी जाणार होते; पण इराणने त्यात सहभागी होण्यास नकार दिल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. 

ट्रम्प यांची ताजी घोषणा म्हणजे अनिश्चिततेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषक म्हणतात. दुसऱ्या बाजूला इराणमध्ये सध्या निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनेई, राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांच्यापैकी नेमके कोणाकडे आहेत, हेच कळेनासे झाले आहे. युरेनियम संवर्धन आणि विद्यमान साठ्याबाबत इराणच्या वाटाघाटीकारांना किती अधिकार द्यायचे, यावर तेहरानमध्येच एकमत नाही. इराणमधील तीन सत्ता केंद्रांपैकी किमान एकाची युद्ध थांबवण्याची इच्छा आहे; पण इतरांना अण्वस्त्र विकास थांबवणे जड जात आहे, असे दिसते. त्यातूनच इराणमधून परस्परविरोधी वक्तव्ये बाहेर येत आहेत. वाटाघाटींचा केंद्रबिंदू युरेनियम संवर्धन हाच आहे आणि या मुद्द्यावर दोन्ही बाजूंमधील दरी प्रचंड आहे. व्हॅन्स यांनी किमान वीस वर्षे युरेनियम संवर्धन स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे, तर इराणने केवळ पाच वर्षांची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या मागण्यांमध्ये युरेनियम संवर्धन बंद, अण्वस्त्र सुविधांचे निर्मूलन आणि समृद्ध युरेनियमच्या इराणबाहेर हस्तांतरणाचा समावेश असून, त्या इराणला मान्य नाहीत. 

दुसरीकडे नाकेबंदी उठवणे ही इराणची वाटाघाटींसाठीची पूर्वअट आहे, तर ट्रम्प यांना नाकेबंदी हे दबावाचे प्रमुख हत्यार सोडायचे नाही. आता हा संघर्ष तीन संभाव्य वळणे घेऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे तडजोडीचा करार; पण त्यासाठी कोणाला तरी युरेनियम संवर्धनाच्या मुद्द्यावर झुकावे लागेल. त्याशिवाय करार शक्य नाही. पाकिस्तानी मध्यस्थ अमेरिका आणि इराणला सामंजस्य करारासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामंजस्य करार झाल्यास अंतिम करारासाठी वेळ मिळेल. हा मार्ग शक्य; पण कठीण आहे. दुसरे वळण म्हणजे पुन्हा युद्ध ! वाटाघाटी फसल्यास एक अस्पष्ट निकाल स्वीकारायचा, की नव्याने निर्णायक मोहिमेला सुरुवात करायची, असा पेच अमेरिकेपुढे निर्माण होईल. इराणी संसदेच्या अध्यक्षांचे सल्लागार ट्रम्प यांच्या युद्धविराम विस्ताराला ‘अचानक हल्ल्यासाठी वेळ विकत घेण्याचा डाव’ म्हणत आहेत. 

तेहरानमध्ये संशयाचे ढग दाटत आहेत. या दुसऱ्या शक्यतेत इराणचे ड्रोन व क्षेपणास्त्र जाळे उद्ध्वस्त करणे, अण्वस्त्र साहित्य जप्त करणे आणि सामुद्रधुनी लष्करी कारवाईने मोकळी करणे, यांचा समावेश होईल. परिस्थितीने हे वळण घेतल्यास संकट आणखी चिघळेल आणि जागतिक ऊर्जा व्यवस्थेला आणखी मोठा धक्का बसेल. तिसरे संभाव्य वळण म्हणजे दीर्घ स्थगन, अनिश्चितता ! युद्धविराम कायम राहील, नाकेबंदी सुरूच राहील ! वाटाघाटी ना पुढे सरकतील, ना पूर्णपणे कोसळतील ! हा मार्ग सर्वाधिक संभाव्य असला, तरी तो सर्वाधिक थकवणारा आणि जगाच्या ऊर्जा पुरवठ्यात दीर्घकालीन अनिश्चितता निर्माण करणारा असेल. 

या संघर्षाचा आणखी एक महत्त्वाचा आयाम म्हणजे अमेरिका-चीन स्पर्धेवर होणारा त्याचा परिणाम ! वाटाघाटी अपयशी ठरल्या आणि अमेरिकेने नव्याने लष्करी दबाव वाढवला, तर चीन निष्क्रिय राहील का, हा कळीचा प्रश्न आहे. होर्मुझमधून जाणाऱ्या तेलाचा सर्वाधिक भाग चीनकडे जातो. होर्मुझच्या कोंडीमुळे बीजिंगचे आर्थिक हितसंबंध थेट धोक्यात आले असल्याने, चीन या संघर्षात थेट जरी उतरला नाही, तरी तो पूर्णपणे तटस्थ राहणे अशक्य आहे. तूर्त, युद्धविरामाच्या बेमुदत विस्ताराने जगाला एका विचित्र सांध्यावर उभे केले आहे. ना पूर्ण शांतता, ना उघड युद्ध ! ट्रम्प यांची अधीरता, तेहरानमधील अंतर्गत फूट आणि होर्मुझवरील जागतिक दबाव परिस्थितीला एकाचवेळी वेगवेगळ्या दिशांना खेचत आहेत. त्यामुळे परिस्थिती नेमके कोणते वळण घेईल, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करण्याशिवाय जगाच्या हाती दुसरे काही नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Weapons sheathed, strangulation continues: Iran's fate uncertain.

Web Summary : Trump extends Iran truce amidst internal divisions. Sanctions persist, creating an impasse. Negotiations stall over uranium enrichment, with potential outcomes including compromise, renewed conflict, or prolonged uncertainty affecting global energy security and China's role.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराण