'बिग बॉस मराठी' चा सीझन ६ काही दिवसांपूर्वीच संपला. अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली. तर राकेश बापट दुसऱ्या क्रमांकावर होता. तन्वी आणि राकेशची घरात चांगलीच गट्टी जमली होती. तन्वी राकेशला 'दादा' म्हणायची. तन्वी जिंकल्याने उपविजेता ठरलेल्या राकेशलाही खूप आनंद झाला. १०० दिवसांनी घरातून बाहेर आल्यानंतर एक्स वाईफ रिद्धी डोगराची काय प्रतिक्रिया होती? याचा खुलासा नुकताच राकेशने केला आहे.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापट म्हणाला, "रिद्धी खूप खूश होती. माझ्यासाठी वोटही करत होती. तिने खूप सपोर्ट केला. आम्ही कायमच एकमेकांना पाठिंबा देतो. आमच्याबद्दल सगळ्यांना माहितच आहे. मला रिद्धीला कुठेही मुद्दामून मध्ये आणायचं नव्हतं. मी स्वत:हूनच तिच्याबद्दल शोमध्ये बोलायचो. कारण मी तिचा आदर करतो. ती कायमच माझी सपोर्ट सिस्टीम राहिली आहे. आम्ही एकमेकांचे आर्मी आहोत. 'राकेश, तू किती मस्त खेळलास. मला वाटलं नव्हतं की तू इतका जेंटलमन सारखा खेळशील' असं ती म्हणाली. तिला माझा अभिमान वाटत होता."
राकेश बापट आणि रिद्धी डोगरा यांचा २०१९ साली घटस्फोट झाला. दोघांनी एकाच मालिकेत काम केलं होतं. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र ८ वर्षानंतर ते वेगळे झाले. घटस्फोटानंतरही राकेश आणि रिद्धी एकमेकांचे चांगले मित्र राहिले. 'मी आजही करिअरमध्ये काही अडलं तर राकेशचं सजेशन घेते' असं रिद्धी म्हणाली होती.
राकेश बापटचं नंतर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीसोबत अफेअर होतं. २०२१ साली 'बिग बॉस ओटीटी' मध्ये असताना त्यांची ओळख झाली. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. नंतर राकेश 'बिग बॉस १५' मध्ये दिसला होता.