शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या उलाढालीवर प्रश्नचिन्ह; आर्थिक साखळीला बसणार मोठा धक्का ?

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 12, 2026 15:50 IST

लग्नसराईच्या तोंडावर सराफा ओळीत चिंता : १० हजारांहून अधिक कारागीर उद्योगावर अवलंबून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
'वर्षभर सोने-चांदीची अनावश्यक खरेदी टाळा', या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनाने संपूर्ण देशातील सुवर्ण बाजारात जणू चिंता पसरली आहे. विशेषतः उपराजधानीची शान असलेल्या आणि विदर्भाची मोठी बाजारपेठ समजल्या जाणान्या नागपूरच्या सराफा ओळीत सध्या या आवाहनाचीच चर्चा रंगली आहे. लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या विधानामुळे कोट्यवधींच्या उलाढालीवर चिंतेचे सावट पसरले असून, सराफा व्यावसायिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  

सोने ही केवळ हौस नाही, तर सुरक्षा

पंतप्रधानांचे आवाहन देशहितासाठी किंवा परकीय चलन वाचवण्यासाठी असू शकते, हे मान्य करूनही सराफा व्यावसायिक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करीत आहेत.

आर्थिक साखळीला बसणार मोठा धक्का ?

नागपूरचा सराफा बाजार हा केवळ मध्य भारताचे व्यापार केंद्र नाही, तर तो हजारो कुटुंबांच्या पोटाचा आधार आहे. जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक सराफांकडे रोजची १०० कोटी रुपयांची सरासरी उलाढाल असणाऱ्या या बाजारपेठेत पंतप्रधानांच्या आवाहनाचा परिणाम सणासुदीच्या काळात ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात सुमारे १० हजारांहून अधिक कारागीर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या उद्योगावर अवलंबून आहेत. जर ग्राहकांनी सोन्याकडे पाठ फिरवली, तर या कारागिरांच्या घरांत अंधार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

"नागपूरच्या सराफा बाजारात सध्या तरी ग्राहकांची गर्दी ओसरलेली नाही. ग्राहकांची खरेदी सुरूच आहे; पण भविष्यात हे आवाहन बंधनकारक होऊ नये. त्यांनी सुचवले आहे की, सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने 'गोल्ड मॉनिटायझेशन'सारख्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, जेणेकरून घरातील पडून असलेले सोने चलनात येईल."
- अंशुल हरडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन

"सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. एका वर्षानंतर जर सोन्याचा भाव २ ते २.५ लाखांच्या घरात गेला, तर आज खरेदी टाळणाऱ्या ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ धातू मानले जात नाही, तर ती एक भावनिक गुंतवणूक आणि संकटकाळचा सोबती मानले जाते. भाववाढीची टांगती तलवार आहे."
- पुरुषोत्तम कावळे, माजी अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन

"पंतप्रधानांचे आवाहन आर्थिक शिस्तीसाठी असेल; पण अशा नकारात्मक संदेशामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण होते. गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. सरकारने उद्योगाशी चर्चा करून संतुलित मार्ग काढायला हवा. आम्ही कौन्सिलचे पदाधिकारी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत.
- राजेश रोकडे, चेअरमन, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल

English
हिंदी सारांश
Web Title : Gold trade faces uncertainty after PM's appeal to citizens.

Web Summary : PM's appeal to avoid gold purchases sparks market concerns in Nagpur. Jewelers fear a significant blow to the economy and livelihoods, impacting artisans and trade during the festive season.
टॅग्स :GoldसोनंnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र