शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांना खास विशेषण; वाचून गंमत वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 20:43 IST

अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा गनिमी कावा फसला; फडणवीसांची प्रांजळ कबुली

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सोबत शपथविधी उरकला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच भूकंप झाला. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आणि सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. याबद्दल बोलताना आमचा गनिमीकावा फसल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अजित पवार यांचं वर्णन कसं कराल, असा प्रश्न फडणवीसांना 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर अजित पवार आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक असल्याचं गमतीशीर उत्तर त्यांनी दिलं. अजित पवार त्या गनिमी काव्याचे नायक असतील, तर मग तुम्ही कोण होतात, असा प्रतिप्रश्न यानंतर विचारण्यात आला. त्यावर मी फसलेल्या गनिमी काव्याचा सहनायक होतो, असं हजरजबाबी उत्तर फडणवीस यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवरही भाष्य केलं. पवार राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत, असं फडणवीस म्हणाले. पंकजा मुंडे माझ्या सहकारी आहेत. त्या बहिणीसारख्या आहेत. सत्ता असताना जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो, असं फडणवीसांना सांगितलं. एकनाथ खडसे  अनेकदा मनात नसलेल्या गोष्टी बोलून जातात. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि राजकीय नुकसान होतं. या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्यास त्यांना फायदा होईल, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे माझे कालही मित्र होते आणि आजही होते, असंदेखील ते पुढे म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे