शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

"...तर विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पार होईल"; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 20:35 IST

पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करण्याचे कार्यकर्त्यांना केलं आवाहन

Chandrashekhar Bawankule, BJP Maharashtra: "महाविकास आघाडी सरकार राज्यात आले, तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील. राज्यात महायुतीचे‌ सरकार आले‌ तर विकासाचे इंजिन धावणार आहे हे साऱ्यांनी जनतेला सांगावे. जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे. त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे. तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल," असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते. यावेळी राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

"देवेंद्र फडणवीस‌ यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत. उद्धव ठाकरे सरकारने मोदी‌ सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील नेतेमंडळी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षात नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहे. अशा वेळी पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी दोन-तीन महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा आणि प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahayutiमहायुती