शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:44 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य़ांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. 

Maharashtra Assembly Election Results

सकाळीच नेतेमंडळी निकालाचा दिवस असल्याने सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळत आहेत. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य़ांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे. "बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या राज्यात महायुतीचं सरकार यावं ज्यामुळे या राज्यातील जनतेला न्याय मिळेल आणि राज्य प्रगतीपथाकडे वाटचाल करेल अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली आहे" असंही सांगितलं. 

 

भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टचं सांगितलं आहे. आम्ही ही निवडणूक महायुती म्हणून लढत आहोत. युतीमध्ये जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. पण युतीमध्ये जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा हे सत्य असतं की, संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर जेव्हा युती जो निर्णय घेईल तो सर्वांनीच स्विकारला पाहिजे. माझ्या मते महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर, संजय निरुपम, शायना एनसी आणि महेश सावंत यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. तसेच दर्शनानंतर त्यांनी निवडणूक निकालावर आणि विजयावर देखील भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी दर्शन घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRahul Narvekarराहुल नार्वेकरcolaba-acकुलाबा