शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

ये पुढे मतदान कर!, जनजागृती अभियान सुरू, ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 17:02 IST

Maharashtra Assembly Election 2024: मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरूवात शुक्रवारी गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 मुंबई -  मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरूवात शुक्रवारी गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या अभियानांतर्गत मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीचे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व  शहर   जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छा दूत नीलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच मान्यवर यावेळी उपस्थित होते.  मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

समुद्रातील बोटींवरही विद्युत रोषणाई- मुंबई पोलिस दलाच्या वाद्यवृंद पथकाचे विशेष सादरीकरण तसेच डाक कार्यालयाने निवडणूकविषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरणही यावेळी  करण्यात आले. नवमतदारांसह उपस्थित सर्वांना समारंभपूर्वक मतदान करण्याची शपथही देण्यात आली. -  मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग