शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:25 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले.  अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या खरेदी  व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांतच स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरुन राज्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर विरोधी पक्षांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. दरम्यान, आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. यावेळी आधी अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलणे टाळले. पण, नंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी तेव्हाच मी त्यांना असे काही करु नका असे सांगितले होते असे अजित पवार म्हणाले. 

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, "जे काही आता टीव्ही चॅनेलवर चालू आहे, त्यासोबत माझा अजित पवार म्हणून डायरेक्ट काही संबंध नाही. मला ३५ वर्षे महाराष्ट्रातील जनता ओळखते, त्या संदर्भात मी आता संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वी असे असे काहीतरी चालले आहे असे कानावर आले होते. त्यावेळी मी त्यांना असले काहीही चुकीचे केलेले मला चालणार नाही , असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीपण करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. पण, त्याच्यानंतर काय झाले मला माहिती नाही, असंही अजित पवार म्हणाले.

"आज परवानग्यांचे टीव्हीला दाखवत आहेत, मी आजपर्यंत कुठल्याही नातेवाईकांचा फायदा होण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही, किंवा सांगितलेले नाही. उलट मी या निमित्ताने अधिकारी वर्गाला सांगेन की माझ्या नावाचा वापर करुन कोणी काही चुकीचे करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी नियमात, कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारा आहे. मुख्यमंत्र्यांनी जरुर याची चौकशी करावी. मी आता त्याची माहिती घेऊन परत तुमची भेट घेऊन माहिती देईन, असंही अजित पवार म्हणाले.

"तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या नावावर आहे. तो पत्ता त्याचा आहे. मी आता बोललो नसतो तर तुम्ही इथे पाणी मुरत आहे म्हणाला असता. मी सगळी माहिती घेऊन तुमच्यासोबत बोलणार आहे. मी या प्रकरणात कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोललो नाही, माझा काहीही संबंध नाही. नियमाच्या, कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असंही अजित पवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar denies involvement in son's land deal controversy.

Web Summary : Ajit Pawar addressed allegations of a land deal involving his son's company, stating he warned against wrongdoing. He denies direct involvement and welcomes investigation, asserting his commitment to legal conduct and transparency. He also said he never used his position for family advantage.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाViral Videoव्हायरल व्हिडिओ