शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:26 IST

Congress Vijay Wadettiwar News: प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी आरक्षण बदलून जागा देण्यात आली, मंत्र्यांच्या संस्थेला जमीन देता येते का? असा सवाल करण्यात आला आहे.

Congress Vijay Wadettiwar News: पुण्यातील कोरेगाव प्रकरण जनतेसमोर आले म्हणून तो व्यवहार रद्द झाला आहे. व्यवहार रद्द झाला म्हणजे चोरी झाली नाही अस होत नाही. चोर तो चोर त्यामुळे या प्रकरणी पार्थ पवारवर कारवाई झालीच पाहिजे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी महायुती सरकारवर टीका केली. पुण्यातील मोक्याची जमीन अधिकाऱ्यांनी दिली, अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे तर त्यांच्यावर  कारवाई करा. पार्थ पवार याला जमीन सरकारची होती, याची माहिती नव्हती, असे उपमुख्यमंत्री म्हणतात, असे बोलून जबाबदारी झटकता येणार नाही. जमीन परत केली म्हणजे गुन्हा झाला नाही असे होत नाही, चोर निर्दोष ठरवता येतो का? चोरी केली म्हणून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

ही जमीन अवघ्या चार कोटींमध्ये देण्यात आली

दुसरीकडे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी मीरा रोड येथील जमीन देण्यात आली. ही जमीन अवघ्या चार कोटींमध्ये देण्यात आली जेव्हा त्या जमिनीचे बाजारमूल्य १०० कोटीच्या आसपास आहे. या जमिनीवर आरक्षण होते, ते आरक्षण बदलून सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी जमीन देण्यात आली. मंत्री,त्यांचे नातेवाईक जमीन लुटत आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.

शेतकरी कर्जमाफी तुमच्या खिशातून मागत आहे का?

मंत्री विखे पाटील यांनी नुकताच शेतकऱ्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. शेतकरी कर्ज काढतात, बुडवितात अस विखे म्हणाले. विखेंना शेतकऱ्यांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? शेतकरी कर्जमाफी तुमच्या खिशातून मागत आहे का? शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला तर शेतकरी सरकारकडे काहीच मागणार नाही,शेतकऱ्यांना हमीभाव द्या, पीकविमा द्या..पण मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली की मंत्री अपमान करतात,महायुतीच्या या मंत्र्यांना शेतकरीच जागा दाखवतील अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करणार याबाबत विचारले असता आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महायुतीमधील पक्ष सोडून इतर पक्षांबरोबर आघाडीबाबत निर्णय स्थानिक पातळीवर होतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress demands action against Parth Pawar in Koregaon land case.

Web Summary : Congress demands action against Parth Pawar in Koregaon land case despite land return. Wadettiwar criticizes government land allocation to Pratap Sarnaik's trust at undervalued price, and slams minister Vikhe Patil's anti-farmer statements, promising farmer backlash.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलpratap sarnaikप्रताप सरनाईकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना