'स्प्लिट्सविला सीझन १६' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रीत सिंहसोबत मुंबईतील एका क्लबमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका क्षुल्लक वादातून प्रीतला अमानुष मारहाण करण्यात आली असून, यात तिचा पुढचा दात तुटला आहे आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रीतने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत व्यथा मांडली आहे.
नेमकं काय घडलं?
प्रीतने व्हिडीओ शेअर करत तिची अवस्था दाखवली. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "मुंबई हे मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे असं मी नेहमीच ऐकलं होतं. पण हे शहर माझं असं स्वागत करेल याची मी कल्पनाही केली नव्हती. आत्ता हे लिहितनाही मी थरथर कापत आहे, माझे डोळे सुजले आहेत आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. माझ्यासोबत जे घडलं त्यातून मी अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मी एका क्लबमध्ये मित्रमंडळींसोबत एन्जॉय करत होते. तेवढ्यात एका मुलगी आली आणि तिने आरडाओरडा सुरु केला. आम्हाला आतमध्ये येण्याची परवानगी कशी दिली असं ती बोलायला लागली. सुरुवातीला आमच्यात शाब्दिक बाचाबाची झाली पण अचानक याचं रुपांतर भयावह वातावरणात झालं. त्या मुलीच्या मित्राने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने मला इतक्या वाईट पद्धतीने मारलं ज्यात माझा दात तुटला आणि चेहरा सुजला. इतर लोकांनी मध्यस्थी केल्यावर त्याने मारहाण थांबवली. नंतर मला समजलं की ती मुलगी सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर होती. इतक्या खुलेपणाने अशी घटना घडू शकते याचा मला धक्काच बसला आहे. अशी परिस्थिती कोणावरही ओढावू नये."
सह-स्पर्धकांचा संताप
प्रीतची ही अवस्था पाहून 'स्प्लिट्सविला १६' मधील तिच्या सह-स्पर्धकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. झलक गोहिलने म्हटले की, "ती रात्र आमच्यासाठी एका भयानक स्वप्नासारखी होती. प्रीतने यावर बोलण्यासाठी जी हिंमत दाखवली त्याचं कौतुक आहे." रुरु ठाकूर, हिमांशु अरोरा यांसारख्या इतर स्पर्धकांनीही प्रीतला धीर देत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अभिनेत्री फातिमा सना शेख, एहसास चन्ना, उर्फी जावेद यांनीही प्रीतला पोलिसात तक्रार दाखल करायचा सल्ला दिला आहे.
कोण आहे प्रीत सिंह?प्रीत सिंह ही एक प्रसिद्ध टीव्ही पर्सनैलिटी आणि सोशल मीडिया स्टार आहे. नुकत्याच गाजलेल्या 'स्प्लिट्सविला १६' मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सनी लिओनी आणि करण कुंद्रा होस्ट करत असलेल्या या शोमधून ती काही भागांपूर्वीच बाहेर पडली होती.
Web Summary : Actress Preet Singh was brutally assaulted in a Mumbai club, resulting in a broken tooth and eye injury. She shared her ordeal on Instagram, sparking outrage from fellow 'Splitsvilla 16' contestants and calls for justice.
Web Summary : मुंबई के एक क्लब में अभिनेत्री प्रीत सिंह पर बेरहमी से हमला किया गया, जिससे उनका दांत टूट गया और आंख में चोट लग गई। उन्होंने इंस्टाग्राम पर अपनी आपबीती साझा की, जिससे 'स्प्लिट्सविला 16' के प्रतियोगियों में आक्रोश फैल गया और न्याय की मांग उठी।