शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:51 IST

1 / 7
Train waiting Ticket Rules: रेल्वेनं प्रवास करणे जितके सुखद आणि रोमांचक असतं, तितकंच मोठं आव्हान कन्फर्म तिकीट मिळवणं हे बनलं आहे. दिवाळी आणि अन्य सणांच्या हंगामात किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी इतकी वाढते की प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळू शकत नाही आणि रेल्वे वेटिंग तिकीट जारी करते. रेल्वे अनेक श्रेणींमध्ये वेटिंग तिकीट देते.
2 / 7
बहुतेक प्रवासी या आशेने बरेच आधी तिकीट बुक करतात की वेळेनुसार त्यांची सीट कन्फर्म होईल, परंतु अनेक वेळा चार्ट तयार होईपर्यंत तिकीट वेटिंगमध्येच राहतं. खरं तर कन्फर्म तिकीट मिळणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही, तर त्यामागे रेल्वेचे काही तांत्रिक नियम आणि प्राधान्यक्रम काम करतात.
3 / 7
वेटिंग तिकीट किती प्रकारचे असते आणि कोणत्या वेटिंग लिस्टमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याचे चांसेस जास्त असतात, हे खूप कमी लोकांना माहित असते. रेल्वेच्या वेटिंग लिस्टमध्ये जनरल वेटिंग लिस्ट (GNWL), रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL), पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (PQWL) आणि तत्काल कोटा वेटिंग लिस्ट (TQWL) अशा अनेक श्रेणी असतात.pai
4 / 7
जनरल वेटिंग लिस्ट (GNWL) ही वेटिंग लिस्ट तेव्हा जारी केली जाते जेव्हा प्रवासी ट्रेनच्या ओरिजिन स्टेशनवरून (जिथून ट्रेन सुरू होते) प्रवास करत असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही दिल्ली ते मुंबई जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट दिल्लीवरून घेतलं, तर तुम्हाला GNWL मिळेल. जर तुम्ही त्याच ट्रेनमध्ये मधल्या कोणत्याही स्टेशनवरून तिकीट घेतलं तर तुम्हाला जनरल वेटिंग मिळणार नाही. या वेटिंग लिस्टचे कन्फर्म होण्याचे चांसेस सर्वात जास्त असतात.
5 / 7
रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL) ही वेटिंग लिस्ट अशा स्टेशनवरून जारी केली जाते, जे ट्रेनच्या मार्गातील महत्त्वाचे मधले स्टेशन असतात. जसं की हावडा ते दिल्ली ट्रेनमध्ये जर एखाद्या व्यक्तीने पाटण्यावरून तिकीट घेतलं तर त्याला RLWL वेटिंग तिकीट मिळेल. या लिस्टच्या कन्फर्म होण्याचे चांसेस GNWL पेक्षा कमी असतात.
6 / 7
पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (PQWL) अशा प्रवाशांसाठी असते, जे ट्रेनच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्टेशनच्या मधल्या स्टेशनवरून प्रवास करतात. हे तिकीट ट्रेन रूटमधील लहान स्टेशनवरून वेटिंग तिकीट घेतल्यावर मिळतं. या वेटिंग लिस्टधून कन्फर्म तिकीट मिळण्याचे चांसेस देखील खूप कमी असतात.
7 / 7
तत्काळ तिकीट बुक करताना जेव्हा कन्फर्म सीट मिळत नाही, तेव्हा तत्काळ कोटा वेटिंग लिस्ट (TQWL) जारी होते. हे कन्फर्म होण्याची शक्यता सर्वात कमी असते, कारण यासाठी कोणताही वेगळा कोटा नसतो.
टॅग्स :railwayरेल्वेMONEYपैसा