शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:00 IST

लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पंजाबचे माजी डीआयजी (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला आहे.

लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पंजाबचे माजी डीआयजी (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी सुरू झाली. भुल्लर यांच्या चंदीगड, लुधियाना, पतियाळा, नाभा आणि जालंधर येथील ११ ठिकाणांची झडती घेतली जात आहे. ही ठिकाणं आरोपी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे भुल्लर यांना गेल्या वर्षी ८ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर केलेल्या छापेमारीत ७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम सापडली होती.

भुल्लर यांच्या ठिकाणांवर आज सुरू असलेली ईडीची कारवाई सीबीआय (CBI) आणि एसीबी (ACB) ने नोंदवलेल्या मूळ गुन्ह्यांशी संबंधित आहे. या गुन्ह्यांमध्ये मध्यस्थाच्या माध्यमातून एखादे गुन्हेगारी प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचंही समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुल्लर आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या चंदीगडमधील दोन, लुधियानामधील ५, पतियाळा येथील दोन आणि नाभा व जालंधरमधील प्रत्येकी एका ठिकाणाची झडती घेतली जात आहे. गुन्ह्यातून कमावलेली अधिक मालमत्ता शोधणं, बेनामी मालमत्तांची ओळख पटवणं आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित पुरावे गोळा करणं हा या शोधमोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

गेल्या वर्षी चंदीगडमध्ये भुल्लर यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीदरम्यान सीबीआयने ७.३६ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, २.३२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने, २६ ब्रँडेड घड्याळं आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-DIG Bhullar's 11 Locations Raided; ₹7.36 Crore Seized

Web Summary : ED raided 11 locations linked to ex-DIG Bhullar in a bribery case. Raids across Chandigarh, Ludhiana, and other cities target assets disproportionate to income. Previous CBI raids at Bhullar's residence uncovered ₹7.36 crore in cash and valuables.
टॅग्स :PunjabपंजाबEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा