शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:21 IST

Imtiaz Jalil on marathi language compulsion: मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून विविध नेतेमंडळी आपली मते मांडत आहेत

Imtiaz Jalil on marathi language compulsion: रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येणे आवश्यक आहे, या नियमाची १ मे या दिवसापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यांना प्रशिक्षण देण्याचीही सरकारची तयारी आहे. त्यामागे त्यांनी मराठी बीएची पदवी घ्यावी, त्यासाठी परीक्षा द्यावी अशी अपेक्षा नाही, तर त्यांना जुजबी मराठी बोलता यायला हवे आणि रोजच्या व्यवहारातील मराठी बोलणे जमले पाहिजे ही भूमिका आहे असे नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली.

"आम्ही मराठीचे समर्थनच करतो. ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. मी खास करून मुस्लिमांना गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमचा मुलगा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असेल आणि त्यानंतर त्याला सरकारी नोकरी हवी असेल, तर त्यासाठी त्यांनी मराठी शिकून घेतलीच पाहिजे. कारण अशा ठिकाणी मराठीचे ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे या गोष्टीकडे कुठल्याही जाती किंवा धर्माच्या नजरेतून पाहू नये. पण जर सरकार असे म्हणत असेल की तुम्ही आठ दिवसांत मराठी बोलायला शिका अन्यथा नव्या दिवशी तुमच्यावर कारवाई केली जाईल किंवा गुंडगिरी केली जाईल, तर मात्र ते योग्य ठरणार नाही," असे अतिशय स्पष्ट मत इम्तियाज जलील यांनी मांडले.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांना वारंवार असाही प्रश्न विचारला जात आहे की, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता येण्याच्या नियमाची निकड आत्ताच का भासली? त्यावरही सरकारकडून त्यांनी उत्तर दिले आहे. "हा नियम प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाही, तो १९८९चा नियम आहे. अनेक रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते अरेरावी करतात. प्रवासी मराठीत बोलत असूनही ते हिंदीतच बोला असे सांगतात. त्यातून भाषावाद निर्माण होतो. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना बॅज देताना जुजबी मराठी बोलता यायलाच हवी," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Imtiaz Jalil: Marathi language is a must, especially for Muslims.

Web Summary : MIM leader Imtiaz Jalil supports Marathi language proficiency, especially for government jobs. He cautions against unrealistic deadlines and potential harassment. The rule requiring Marathi for rickshaw drivers isn't new, aiming to address language-related complaints.
टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलmarathiमराठीMuslimमुस्लीम