शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान

By संतोष कनमुसे | Updated: April 27, 2026 10:52 IST

इराणच्या एका खासदाराने प्रादेशिक चर्चेत पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. एका महत्त्वपूर्ण राजनैतिक टप्प्यावर पाकिस्तानच्या तटस्थतेबाबत इराणने प्रश्न उपस्थित केले आहे.

इराणच्या नॅशनल सिक्युरिटी अँड फॉरेन पॉलिसी कमिशनचे प्रवक्ते इब्राहिम रेझाही यांनी याबाबत पोस्ट केली आहे.'मध्यस्थीसाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता पाकिस्तानकडे नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर केलेल्या पोस्टमध्ये रेझाही यांनी पाकिस्तानला "एक चांगला मित्र आणि शेजारी" असे संबोधले, पण "तो एक योग्य मध्यस्थ नाही" असा दावा केला. पाकिस्तानचा कल नेहमीच अमेरिकेच्या हिताकडे असतो, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर

"पाकिस्तान उघडपणे अमेरिकेवर टीका करणे टाळत आहे, असा आरोपही त्यांनी केला. लेबनॉनवरील हल्ले असोत किंवा इराणची जप्त केलेली मालमत्ता, अमेरिका आपली आश्वासने पाळण्यात अपयशी ठरली आहे, हे पाकिस्तान कधीच ठळकपणे मांडत नाही. मध्यस्थ हा नेहमीच निष्पक्ष असायला हवा, त्याने एका बाजूला झुकलेले असू नये, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

अब्बास अराघची यांचे राजनैतिक प्रयत्न

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे चर्चा जिवंत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वेगाने करत आहेत, यावेळीच या खासदाराने हे विधान केले आहे. अराघची यांनी गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा इस्लामाबादला भेट दिली, तिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी संघर्ष आणि संभाव्य मार्गांवर चर्चा केली.

यापूर्वी अराघची यांनी ओमानचे सुल्तान हैथम बिन तारिक अल-सैद यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती. ओमानमधील चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू 'होर्मुझची सामुद्रधुनी' आणि त्या क्षेत्रातील सुरक्षा हा होता.

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, ही चर्चा फक्त अण्वस्त्र मुद्द्यापुरती मर्यादित नाही. यात होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर चौकट, भरपाईची मागणी, भविष्यातील लष्करी कारवाईविरुद्ध हमी आणि अमेरिकेने लादलेले सागरी निर्बंध उठवण्याबाबतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. इस्लामाबादमधील अल्प मुक्कामानंतर अराघची आता मॉस्को दौऱ्यावर जाणार आहेत.

ट्रम्प यांचे थेट चर्चेचे आवाहन

दुसरीकडे, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सोडवण्याचे राजनैतिक प्रयत्न थंडावलेले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. इराणला चर्चा करायची असेल तर ते थेट संपर्क साधण्यास मोकळे आहेत," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने पुढाकार घेण्यापासून माघार घेतली असून पाकिस्तानमधील नियोजित चर्चेची फेरी रद्द केल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "जर त्यांना बोलायचे असेल, तर ते आमच्याकडे येऊ शकतात किंवा आम्हाला कॉल करू शकतात. तुम्हाला माहिती आहे की तिथे टेलिफोन आहे. आमच्याकडे सुरक्षित लाईन्स उपलब्ध आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Says Pakistan Unfit Mediator in US-Israel Conflict.

Web Summary : Iran deems Pakistan unsuitable as a mediator due to its pro-US stance. Despite diplomatic efforts, an Iranian official criticized Pakistan's neutrality. Direct talks between the US and Iran are now suggested amid rising tensions and stalled negotiations.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिका