दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या कैलास हिल्समध्ये आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. गुन्हा करून घरातून पळून जात असताना आरोपी राहुल मीणा याने सर्वात आधी आपल्या भावाला फोन केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फोनवर बोलताना पळत असलेल्या राहुलने घाबरत आपल्या भावाला सांगितलं की, "मी दिल्लीत मोठा गुन्हा केला आहे, आता पोलीस मला पकडतील... मी आता मरणार आहे."
पोलीस तपासात समोर आलं आहे की, राहुल मीणा याने अवघ्या काही तासांत दोन वेगवेगळ्या राज्यांत गुन्हे केले. मंगळवारी रात्री १०:३० वाजता राहुल सर्वात आधी अलवरमध्ये एका मित्राच्या घरात घुसला. तिथे त्याने मित्राच्या पत्नीला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. चौकशीत त्याने तिथे गेल्याची कबुली दिली, पण बलात्काराचा आरोप फेटाळून लावत तो फक्त आपला मोबाईल घेण्यासाठी गेला असल्याचं सांगितलं.
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
बुधवारी सकाळी ६:३० वाजता अलवरहून सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास करून तो दिल्लीतील कैलास हिल्स येथे पोहोचला. सकाळी अंदाजे ६:३९ वाजता, जेव्हा अधिकारी आणि त्यांची पत्नी मॉर्निंग वॉकला गेले होते, तेव्हा राहुल त्यांच्या घरात शिरला आणि त्यांच्या मुलीची पैशासाठी हत्या केली.
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल फोनवर बोलताना पळताना दिसत आहे, ज्यावरून त्याचं लोकेशन समोर आलं. आरोपी आणि पीडिता या दोघांचेही मोबाईल सध्या गायब आहेत. हे फोन जप्त केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आपल्या भावाशी बोलताना राहुलच्या मनात अटक आणि कायदेशीर परिणामांची भीती स्पष्टपणे दिसून येत होती.
Web Summary : After murdering an IRS officer's daughter in Delhi, Rahul called his brother, confessing the crime and fearing arrest. He also assaulted a woman in Alwar. CCTV footage captured his panicked escape, revealing his location. Both victim's and accused mobile phones are missing.
Web Summary : दिल्ली में आईआरएस अधिकारी की बेटी की हत्या के बाद, राहुल ने अपने भाई को फोन किया, अपराध कबूल किया और गिरफ्तारी से डर गया। उसने अलवर में एक महिला पर भी हमला किया। सीसीटीवी फुटेज में उसकी घबराई हुई भागने की हरकत कैद हुई, जिससे उसका ठिकाना पता चला। पीड़ित और आरोपी दोनों के मोबाइल फोन गायब हैं।