वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्या वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील सुरक्षेचे अनेक स्तर भेदून हल्लेखोर आत शिरला होता. तो या हॉटेलचा नोंदणीकृत ‘गेस्ट’ (पाहुणा) असल्यानेच तो सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊ शकला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ट्रम्प यांच्यासह अनेक महत्त्वाचे व्हीआयपी येत असल्याने शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून हॉटेल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. रात्री ८ वाजता मेजवानी सुरू होणार होती. केवळ हॉटेलमध्ये रूम असलेले पाहुणे, डिनरची तिकिटे असलेल्या व्यक्ती, निमंत्रक आणि पत्रकार यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात होता. मुख्य बॉलरूममध्ये सुमारे २,३०० पाहुणे होते. तिथे प्रवेश करण्यासाठी ‘मॅग्नेटोमीटर’ (मेटल डिटेक्टर) मधून जाणे अनिवार्य होते. ज्याचे नियंत्रण सिक्रेट सर्व्हिस व पोलिसांकडे होते.
‘मल्टी-लेयर्ड प्रोटेक्शन’ यंत्रणामेटल डिटेक्टर केव्हा काढायचा याची वेळ ठरलेली असते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एकदा बॉलरूममध्ये आपल्या जागेवर बसले की, नव्या पाहुण्यांना आत येण्यास बंदी असते. त्यानुसार सुरक्षारक्षक मेटल डिटेक्टर काढण्याचे काम करत होते. ट्रम्पनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर नेमका याच वेळी सुरक्षारक्षकांच्या जवळून धावताना दिसत आहे.
स्टेजवरील विशेष सुरक्षा उपाय : राष्ट्राध्यक्षांच्या जवळ कोणीही पोहोचू नये म्हणून सिक्रेट सर्व्हिसने अत्यंत कडक पावले उचलली होती. ट्रम्प आणि इतर पाहुण्यांमध्ये एक सुरक्षित अंतर राखले गेले होते. ज्या टेबलावर ट्रम्प बसले होते, त्याखाली बुलेटप्रूफ प्लेट्स लावण्यात आल्या होत्या. स्टेजच्या समोर आणि बाजूला सशस्त्र ‘काउंटर-असॉल्ट’ एजंट्स तैनात होते. हल्लेखोर प्रत्यक्ष बॉलरुममध्ये घुसण्याआधीच त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले व पुढचा अनर्थ टळला.
हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर; कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री‘व्हाइट हाऊस करस्पाँडंट्स डिनर’मध्ये गोळीबार करणारा कोल टॉमस ॲलन हा केवळ एक गुन्हेगार नसून तो एक उच्चशिक्षित ट्यूटर आणि हौशी व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे. ॲलनने २०१७ मध्ये प्रसिद्ध ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (कॅलटेक) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली होती. त्याने ‘कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी’मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री संपादन केली. तो गेल्या सहा वर्षांपासून ‘सी२ एज्युकेशन’ नावाच्या नामांकित संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. २०२४ मध्ये त्याला कंपनीने ‘टीचर ऑफ द मंथ’ म्हणून गौरविले होते. त्याने व्हीलचेअरचे ‘इमर्जन्सी ब्रेक प्रोटोटाइप’ विकसित केले होते, ज्याची दखल स्थानिक ‘एबीसी’ चॅनलनेही घेतली होती. तो ‘शूटर’ कॉम्बॅट गेमवर काम करत होता.
Web Summary : Washington Hilton's security was breached by a registered guest. The assailant, Cole Thomas Allen, holds degrees in engineering and computer science. He was a tutor recognized for his work and game development.
Web Summary : वाशिंगटन हिल्टन की सुरक्षा एक पंजीकृत अतिथि द्वारा तोड़ी गई। हमलावर, कोल थॉमस एलन, इंजीनियरिंग और कंप्यूटर विज्ञान में डिग्री रखता है। वह अपने काम और खेल विकास के लिए पहचाने जाने वाले एक शिक्षक थे।