शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:12 IST

White House Correspondent Shooting: व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डन्ट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डन्ट्स डिनरदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीबीएस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले असून, "मी बलात्कारी नाही," अशा शब्दांत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तसेच, सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाकडून केली जाणारी द्वेषपूर्ण भाषणे ही राष्ट्रासाठी प्रत्यक्ष गोळीबारापेक्षाही मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्या घटनेची आठवण करून देताना ट्रम्प म्हणाले की, "गोळीबाराचा आवाज येताच मी आणि फर्स्ट लेडी सुरक्षिततेसाठी ताबडतोब जमिनीवर आडवे झालो. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि हल्लेखोराला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मला नेमके काय घडतेय हे पाहायचे होते, परंतु सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी मला पूर्णपणे घेरले होते. त्यांच्या चपळाईमुळे आणि चोख कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला."

हल्लेखोराबद्दल माहिती देताना ट्रम्प यांनी धक्कादायक खुलासा केला. "हल्लेखोर हा पूर्वी एक निष्ठावान ख्रिश्चन होता. मात्र, अचानक तो कट्टर ख्रिश्चन-विरोधी विचारसरणीकडे वळला. त्याच्या स्वभावात झालेला हा बदल अत्यंत धक्कादायक होता,  तो इतका चपळ होता की त्याला चक्क 'एनएफएल'संघात स्थान द्यायला हवे होते. संबंधित हल्लेखोराच्या संशयास्पद वागणुकीबद्दल त्याच्या कुटुंबाने पोलिसांना आधीच कल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला.

चीन आणि इराण संघर्षावर भाष्य

दुसरीकडे, 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रकाश टाकला. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात चीनची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. "चीन या प्रकरणात मदत करत आहे. परंतु, ते यापेक्षा अधिक चांगले योगदान देऊ शकतात. तरीही, सध्याच्या जागतिक स्थितीबाबत मी फारसा निराश नाही," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump denies allegations, blames Democrats after shooting incident.

Web Summary : Following a shooting, Trump refuted accusations, stating, "I am not a rapist." He criticized Democratic rhetoric as more dangerous than gunfire. He described the shooting incident and the shooter's background. Trump also addressed China's role in the Iran conflict, expressing cautious optimism about the global situation.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका