इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या रशिया दौऱ्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. जर इराणने तीन दिवसांत करार केला नाही, तर त्यांच्या तेलवाहिन्यांमध्ये मोठा स्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. इराण तेल निर्यात करू शकणार नाही. नाकेबंदीमुळे इराण जहाजांमार्फत निर्यात करू शकत नाही. आणि पाइपलाइन कोसळल्यानंतर त्याची निर्यात पूर्णपणे थांबेल, असे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. इराणचे परराष्ट्र मंत्री पुन्हा एकदा पाकिस्तानहून रशियात पोहोचले आहेत. ते आता पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. रशियन माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे.
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
इराणचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेशी चर्चेसाठी पाकिस्तानला गेले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास नकार दिला. यानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी रशिया आणि ओमानचाही दौरा केला. ते रशियाच्या दौऱ्यावरून पाकिस्तानला परतले. दरम्यान, ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांचे पथक आता पाकिस्तानला जाणार नाही, पण कोणतीही चर्चा फोनवरच केली जाईल असे ट्रम्प यांनी सांगितले.
इराणने आपला प्रस्ताव पाठवला
इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना एक लेखी प्रस्ताव पाठवला, हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणने दुसरा प्रस्ताव पाठवला, हा आधीच्या प्रस्तावापेक्षा अधिक चांगला होता, असा दावा ट्रम्प यांनी केला. चर्चेसाठी खूप प्रवास करावा लागतो आणि आता सर्व चर्चा फोनवरच होतील, असे ट्रम्प यांनी सांगितले. इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाला परतले असून, पुढील चर्चा मॉस्कोमध्ये होईल, असे इराणने म्हटले आहे.
अराघची "युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठीच्या कोणत्याही कराराच्या चौकटीवर इराणची भूमिका आणि विचार" मांडतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी इराणची तेलवाहिनी उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.
Web Summary : Trump is angered by Iran's foreign minister's Russia visit, issuing a 72-hour ultimatum. He threatens to destroy Iranian oil pipelines if a deal isn't reached, preventing oil exports. Iran sent proposals, but Trump prefers phone discussions. Iran's minister will discuss ending war in Moscow.
Web Summary : ट्रंप ईरान के विदेश मंत्री की रूस यात्रा से नाराज हैं, 72 घंटे का अल्टीमेटम जारी किया। उन्होंने समझौता नहीं होने पर ईरानी तेल पाइपलाइनों को नष्ट करने की धमकी दी, जिससे तेल निर्यात रुक जाएगा। ईरान ने प्रस्ताव भेजे, लेकिन ट्रंप फोन पर चर्चा पसंद करते हैं। ईरान के मंत्री मास्को में युद्ध खत्म करने पर चर्चा करेंगे।