इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?

By संतोष कनमुसे | Updated: April 27, 2026 09:22 IST2026-04-27T09:01:42+5:302026-04-27T09:22:15+5:30

पाकिस्तानमार्फत इराणने अमेरिकेला एक संदेश पाठवला आहे. यामध्ये अणू कार्यक्रम आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ सारखे मुद्दे आहेत, यामध्ये इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Iran's direct warning to donald trump Red Line message sent through Pakistan; What is the plan? | इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?

इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन अपडेट समोर आली आहे. इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला आपल्या 'रेड लाईन्स' कळवल्या आहेत, म्हणजेच वाटाघाटींसाठी स्पष्ट मर्यादा आणि अटी सांगितल्या आहेत. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान हा संदेश पाठवण्यात आला.

Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ

इराणने अमेरिकेला लिखित संदेश पाठवला आहे. यामध्ये इराणने वाटाघाटीसाठीच्या आपल्या मर्यादा अमेरिकेला कळवल्या आहेत, यामध्ये अणू कार्यक्रम आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ सारखे मुद्दे आहेत. 

इराणनचे अराघची हे ठरलेल्या 'रेड लाइन्स' आणि त्यांच्या राजनैतिक अधिकारांच्या मर्यादेत राहून काम करत आहेत. म्हणजेच इराण कोणाच्याही दबावाखाली येऊन मुळ मुद्द्यावर तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. इराणने टप्प्याटप्प्याने चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. 

चर्चा सुरू ठेवण्यासाठी इराणच्या अटी

इराण स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्यास तयार आहे. पण अणू कार्यक्रमावर चर्चा नंतर होईल, असे इराणने सांगितले. अमेरिकेला सर्वात आधी इराणी पोर्टवरील नाकेबंदी हटवावी लागेल तरच पुढील वाटाघाटी शक्य होतील असे इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिका इराणच्या 'अणुऊर्जेवर' नियंत्रण मिळवेल. इराणने अमेरिकेला समाधानकारक ठरेल असा प्रस्ताव सादर केला पाहिजे. 

अब्बास अराघची रशियाला पोहोचले

इस्लामाबादच्या दौऱ्यानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची आता मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. तेहरान आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा पुढे चालू राहावी या मध्यस्थीच्या अपेक्षेने ते एका राजधानीतून दुसऱ्या राजधानीत प्रवास करत आहेत. 

Web Title : ईरान ने पाकिस्तान के माध्यम से ट्रम्प को चेतावनी दी: 'रेड लाइन्स' संदेश भेजा

Web Summary : अमेरिकी तनाव के बीच, ईरान ने पाकिस्तान के माध्यम से अमेरिका को अपनी 'रेड लाइन्स' दीं, जिसमें बातचीत की शर्तें निर्धारित की गईं। प्रमुख मुद्दों में परमाणु कार्यक्रम और होर्मुज जलडमरूमध्य शामिल हैं। ईरान आगे की बातचीत से पहले प्रतिबंध हटाने की मांग करता है। अमेरिका का लक्ष्य ईरान की परमाणु ऊर्जा को नियंत्रित करना है।

Web Title : Iran Warns Trump Via Pakistan: 'Red Lines' Message Delivered

Web Summary : Amid US tensions, Iran conveyed its 'red lines' to America via Pakistan, setting negotiation terms. Key issues include the nuclear program and Strait of Hormuz. Iran seeks lifting of sanctions before further talks. The US aims to control Iran's nuclear energy.