Latest Marathi News Live: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार: JDU च्या सूत्रांची माहिती
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 20:46 IST2026-03-04T10:53:45+5:302026-03-04T20:46:07+5:30
अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धाशी संबंधित घडामोडींचे आणि महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स....

Latest Marathi News Live: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार: JDU च्या सूत्रांची माहिती
US-Israel Iran War Marathi News Live Updates 4 March 2026: अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धाशी संबंधित घडामोडींचे आणि महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स....
LIVE
04 Mar, 26 : 08:45 PM
इराणची युद्धनौका अमेरिकेने बुडवली; ८० सैनिकांचा मृत्यू
भारतातून सराव आटोपून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेने पाणबुडीतून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. सविस्तर वाचा...
04 Mar, 26 : 07:42 PM
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा
बिहारच्या राजकारणात सध्या मोठं वादळ निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात अशी चर्चा आहे. जर त्यांनी अर्ज दाखल केला तर बिहारमध्ये मोठे राजकीय परिवर्तन होऊ शकते.
04 Mar, 26 : 07:37 PM
सेमीफायनआधी प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतलं श्री सिद्धिविनायकाचे दर्शन
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात पूजा केली.
#WATCH मुंबई: भारतीय क्रिकेट टीम के हेड कोच गौतम गंभीर ने अपने परिवार के साथ मुंबई के श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर में पूजा-अर्चना की। pic.twitter.com/u2XDwar0JP
— ANI_HindiNews (@AHindinews) March 4, 2026
04 Mar, 26 : 06:16 PM
इराणी जहाजावर श्रीलंकेच्या तटावर पाणबुडीचा मोठा हल्ला, १०१ जण बेपत्ता
श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ एका पाणबुडीने इराणी जहाजावर हल्ला केल्यानंतर किमान १०१ जण बेपत्ता झाले आहेत आणि ७८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी रॉयटर्सला दिली.
04 Mar, 26 : 05:25 PM
राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याची काँग्रेस हायकमांडची सूचना
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकमांडने आदेश दिल्यानंतर राज्यातील काँग्रेस आमदार शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
04 Mar, 26 : 05:16 PM
खासदार उदयनराजे भोसले झाले भावूक, वडिलांच्या स्मारकासमोर नतमस्तक होताना अश्रू अनावर
आज खासदार उदयनराजे भोसले यांचे पिताश्री प्रतापसिंहराजे भोसले यांची पुण्यतिथी आहे. साताऱ्यातील आयुर्वेदिक गार्डन येथे असलेल्या प्रतापसिंह महाराज यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी उदयनराजे यांना अश्रू रोखता आले नाहीत.
04 Mar, 26 : 04:53 PM
साताऱ्यात गॅरेज मालकावर हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी काढली 'भरचौकात धिंड'
सातारा येथील करंजे नाका आणि मोळाचा ओढा परिसरात भरदिवसा कोयत्याने थरार निर्माण करणाऱ्या गुंडांची शाहूपुरी पोलिसांनी आज पायी धिंड काढली. गॅरेज मालकावर जीवघेणा हल्ला करून पळ काढणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी त्यांच्याच गुन्हेगारी क्षेत्रातून फिरवून त्यांचा 'वचक' संपवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी करंजे पेठ नाका येथील एका गॅरेजमध्ये शिरून ३ ते ४ संशयितांनी गॅरेज मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सातारा शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
04 Mar, 26 : 04:02 PM
श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणी युद्धनौका बुडवली; १०१ बेपत्ता
श्रीलंकेजवळील पाणबुडी हल्ल्यात इराणची युद्धनौका बुडाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १०१ इराणी सैनिक बेपत्ता झाले असून ७८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींवर श्रीलंकेतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
04 Mar, 26 : 03:32 PM
सोलापुरात इराण-इस्रायल युद्धाचा 'हायव्होल्टेज ड्रामा'! 'माकप'कडून ट्रम्प-नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलन; हिंदुत्ववाद्यांनीही दिल्या घोषणा
सोलापूर: इराण आणि इस्रायलमधील यु्द्धाचा आजा सोलापूरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली माकपने आंदोलन पुकारले. या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. यामुळे जिल्हा परिषद कार्यालयाचा 'पूनम गेट' परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
04 Mar, 26 : 02:08 PM
पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेवर महापालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधकामावर कारवाई
पुण्यातील विमाननगर भागातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे परिसरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मोठी कारवाई केली.
04 Mar, 26 : 01:32 PM
परदेशात अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू
परदेशात अडकलेल्या व्यक्तींच्या संपर्कासाठी केंद्रासोबत संपर्कात आहोत. परदेशातील मराठी मंडळाच्या माध्यमातून लोकांना मदत केली जात आहे. एअर इंडियाच्या विमानाद्वारे लोकांना परत आणण्याचं काम सुरू आहे. अडकलेल्या व्यक्तींसोबत सरकार संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने तिथल्या काही लोकांना परत आणले आहे. असुरक्षित एअरस्पेसमध्ये एखादे विमान गेले तर काय होऊ शकते हे ठाऊक असल्याने केंद्र सरकार आपल्या स्तरावर लोकांना परत आणण्याचा प्रयत्न करतेय. हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना जी मदत लागेल ती केली जात आहे. पुढील २-३ दिवसात लोक माघारी परतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
04 Mar, 26 : 01:05 PM
भारत आणि चीनला रोखण्यासाठी युद्धाचा खेळ, इराणचा अमेरिकेवर गंभीर आरोप
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध पेटलेले असतानाच आता इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. एएनआयशी बोलताना भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही म्हणाले, "नजीकच्या काळात भारत, चीन, रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असतील. मात्र, अमेरिकेला सत्तेमध्ये कुणाचीही भागीदारी नको आहे. भारत अथवा चीन महाशक्ती म्हणून उदयाला येऊ नयेत, यासाठीच अमेरिका, अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहे. जेणेकरून जगावर केवळ अमेरिकेचेच वर्चस्व कायम राहील."
04 Mar, 26 : 12:59 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली?
मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. विलीनीकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे दावे करत होते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टपणे खुलासा करत यापुढे विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. ही चर्चा आता थांबली आहे असं त्यांनी म्हटलं. (सविस्तर वाचा)
04 Mar, 26 : 12:49 PM
शिवतीर्थावर पार पडली मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक
९ मार्चला होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनी सर्व पदाधिकारी, नगरसेवकांनी कार्यक्रमाला १०० टक्के उपस्थिती लावावी अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. शिवतीर्थावर आज मनसेच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात वर्धापन दिन कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
04 Mar, 26 : 12:07 PM
वृंदावनच्या होळीत परदेशी महिलेच्या डोळ्यात फेकला दगडमिश्रित रंग
दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक वृंदावनच्या होळीचा आनंद घेतात. येथील मंदिरांमधील उत्सव आणि रंगांची उधळण जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र यंदा एका ऑस्ट्रियन महिलेसाठी हा अनुभव अत्यंत वेदनदायी ठरला. होळी खेळताना कुणीतरी तिच्या डोळ्यात दगडमिश्रित रंग फेकला, ज्यामुळे तिला धूसर दिसत असल्याचा दावा तिने केला आहे. वाचा सविस्तर
04 Mar, 26 : 12:04 PM
भाजपाने राज्यसभेच्या चार जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली
भाजपाने राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपा नेते विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माया इवनाते, रामदास वडकुते यांचा समावेश आहे.
04 Mar, 26 : 12:02 PM
इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी हाक
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा फटका तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसत आहे. इराणमधील उर्मिया शहरात अडकलेल्या सुमारे ११० भारतीय विद्यार्थ्यांनी एका व्हिडिओद्वारे भारत सरकारकडे मदतीसाठी हाक दिली. आमच्या घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोट होत आहेत, आम्ही सुरक्षित नाही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली भीती व्यक्त केली आहे.
04 Mar, 26 : 11:50 AM
'डिजिटल धमकी' देणाऱ्या मास्टरमाईंडला अटक
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांत बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे ईमेल पाठवले जात होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रांच आणि सायबर क्राईम युनिटने मोठी कारवाई केली. या ईमेल्समागील मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. सौरभ बिस्वास असं या आरोपीचं नाव असून त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. शाळा आणि न्यायालयांना धमकीचे ईमेल पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सौरभ बिस्वास हा या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर
04 Mar, 26 : 11:49 AM
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा रुपयाला मोठा फटका
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम शेअर बाजारासोबतच भारतीय चलनावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया घसरून नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ७१ पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९२.१८ या विक्रमी नीचांकी स्तरावर आला.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम शेअर बाजारासोबतच भारतीय चलनावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया घसरून नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला.#america#iranisraelwar#dollar#Rupeehttps://t.co/ctS7FLg5AL
— Lokmat (@lokmat) March 4, 2026
04 Mar, 26 : 11:27 AM
अमेरिका इराणच्या भूमिवर आपले सैन्य उतरवणार का?
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकायुद्ध सुरू होऊन आज चार दिवस झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या करण्यात आल्यानंतर इराणचे इस्रायल-अमेरिकेविरोधात हल्ले वाढले आहेत. हे युद्ध आणखी किती चिघळणार आणि कधीपर्यंत चालणार, याबद्दल अद्याप तरी चित्र स्पष्ट दिसत नाहीये. कारण इराणमध्ये सत्तांतर घडवून आणायचं की नाही, याबद्दल ठोस भूमिका मांडलेली नाही. पण, इराणमध्ये सैन्य उतरवण्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे विधान केले आहे.
04 Mar, 26 : 11:23 AM
मोदींना निरोप अन् इराणची 'तबाही' सुरू...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर, काही वेळातच इराणवर झालेल्या भीषण हल्ल्याने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. इस्रायलनेइराणवरील हल्ल्यासाठी हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? असे प्रश्नही अनेकांना पडले. यासंदर्भात आता भारतामधील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
वाचा संपूर्ण बातमी
04 Mar, 26 : 11:21 AM
कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी?
इराणमधील सत्तासंघर्षात आता एका नवीन नावाचा उदय झाला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर आता त्यांचा ५६ वर्षीय मुलगा मोजतबा खामेनी याने इराणच्या 'सुप्रीम लीडर'पदाची धुरा हाती घेतली आहे. मोजतबा केवळ धार्मिक किंवा राजकीय वारसदार नाही, तर तो एका अफाट संपत्तीचा मालक देखील आहे. त्याचे साम्राज्य केवळ इराणपुरते मर्यादित नसून जगातील अनेक प्रगत देशांपर्यंत पसरलेले आहे.