शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारे रेशनचे ७८ क्विंटल धान्य पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 13:24 IST

Crime in Hingoli : हिंगोली शहरातून दोन वाहनाद्वारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

ठळक मुद्देपोलिसांनी पकडलेल्या एका वाहनातील रेशनच्या धान्यासाठी वापरलेल्या थैल्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय प्रा. लि. असे छापलेले आहे.

हिंगोली : रेशनचे ७८ क्विंटल धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारी दोन वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. ही कारवाई ७ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हिंगोली शहरातील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोन पिकअप चालकांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

हिंगोली शहरातून दोन वाहनाद्वारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात नेले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बालाजी बोके, पोह. संभाजी लेकूळे, राजू ठाकूर, भगवान शिंगाडे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने ७ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा लावला. 

यावेळी एमएच ४० सीडी ११७४ व एमएच ३७ टी १६६४ क्रमांकाचे पिक अप वाहने थांबवून तपासणी केली असता या वाहनात रेशनचे धान्य असल्याचे आढळले. एमएच ४० सीडी ११७४ या वाहनात ७० थैलीमध्ये ६९ हजार रूपयांचा ३४.५ क्विंटल रेशनवर दिला जाणारा तांदूळ व ११ थैलीमध्ये ११ हजार रूपये किमतीचे ५.५ क्विंटल गहू असा एकूण ४० क्विंटल धान्य साठा आढळून आला. तर एमएच ३७ टी १६६४ या वाहनात ७७ थैलीमध्ये ७६ हजार रूपये किमतीचे ३८ क्विंटल गहू आढळला. पोलिसांनी दोन्ही वाहने रेशनच्या धान्यासह ताब्यात घेतले असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक किशोर पोटे यांच्या फिर्यादीवरून चालक अरबाज असिफ खान (रा. पलटन, हिंगोली), कैलास प्रेमानंद पेषकलवाड (रा. उफळी पेन ता. वाशीम) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय नावाची पाेतेपोलिसांनी पकडलेल्या एका वाहनातील रेशनच्या धान्यासाठी वापरलेल्या थैल्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय प्रा. लि. असे छापलेले आहे. रेशनचे धान्य कोठून आणले, कोणत्या दुकानाचे होते, कोठे नेले जाणार होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस