बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...
वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरत ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे मंगळवारी चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून एका मोबाईल दुकानातून ५४ मोबाईल तर एका दुकानातून ३० हजारांची रोकड, १८ हळदीचे कट्टे असे १ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे शिरडशह ...
जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे. ...
येथील सावंगी रोडवरील एरिगेशन कॅम्पच्या उत्तरेकडील आखाड्यांना व नवीन वसाहतीला आग लागली. सदरील आग हट्टा ते सावंगी वीज वाहिनीवर तारांचा स्पर्श झाल्याने परिसरातील गवत पेटत गेले व जोराच्या वाऱ्यामुळे परिसर आगीने कवेत घेतल्याचे सांगितले जाते. ...
जिल्ह्यात ६ ते १९ मे या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण गावात गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणले जाणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये मागील काही दिवसांपासून असलेल्या नाराजीचा उद्रेक आज सर्वसाधारण सभेत झाला. थेट सीईओंना लक्ष करून सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सभेवर बहिष्कार टाकला. ...