शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Exam Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
3
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
4
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
5
Video - "चोर-चोर, TMC चोर";निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
6
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
7
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
8
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
9
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
10
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
11
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
12
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
13
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
14
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
15
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
16
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
17
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
18
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
19
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
20
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
Daily Top 2Weekly Top 5

21 दिवसांच्या 'लॉकडाऊन'दरम्यान आपलं वजन 'अप' होऊ नये यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:37 IST

दोन-तीन आठवडे घरात बसून राहिल्यास वजन वाढण्याचा धोका आहे. हा धोका कसा टाळाल?

ठळक मुद्देपुढचे आणखी दोन-तीन आठवडे घरातच बसून राहायची वेळ आलेली असताना ‘हवं ते खात’ सुटू नका. शरीराला कोणताच व्यायाम नसल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते.

>> डॉ. स्नेहल अडसुळे 

कोरोना व्हायरसपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आणि घरातच क्वारंटाइन म्हणजे विलग होणे आवश्यक आहे. पण गेले तीन-चार दिवस घरात बसून आहात आणि आता पुढचे आणखी दोन-तीन आठवडे घरातच बसून राहायची वेळ आलेली असताना ‘हवं ते खात’ सुटू नका. कारण जेव्हा आपण अधिकाधिक वेळ घरातच बसून राहतो तेव्हा एकतर वारंवार भूक लागते आणि दुसरीकडे, शरीराला कोणताच व्यायाम नसल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून तर दूर रहाल पण वजन वाढल्यामुळे दुसऱ्याच काही आजारांना निमंत्रण देऊन बसाल!

हे जर टाळायचं असेल, तर पुढचे काही दिवस पुढील काळजी आवर्जून घ्या. न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन डॉ. स्नेहल अडसुळे ह्यांनी सांगितलेल्या टिप्स : 

आहारात प्रथिनांचा समावेश करा-
जेव्हा वजन कमी करायचं असतं, तेव्हा न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटिन्सला म्हणजे प्रथिनांना राजा मानलं जातं. तुमचं पोट भरताना पुरेशी प्रथिनं तुमच्या शरीरात जातील, ह्याची काळजी आवर्जून घ्या.

आरोग्यदायी स्नॅक्स खा-
घरी बसून किंवा नेटफ्लिक्सवर वेबसीरीज बघून कंटाळा आला की, आपले हात आपोआप स्नॅक्सवर जातात. अरबट-चरबट स्नॅक्स चवीला चांगले लागले तरी शरीराला ते अपायकारकच. शिवाय, ते खाल्ल्यामुळे वजन वाढणार ह्याची ग्यॅरंटीच. म्हणून यॉगहर्ट, फळं, नट्स, गाजर, उकडलेली अंडी ह्यांचा तुमच्या स्नॅक्समध्ये समावेश करा.

साखरेवर लक्ष असू द्या-
घरी आहात म्हणून उठ-सूठ चहा पिऊ नका. चहामधून तुमच्या शरीरात अतिरिक्त साखर जाऊ शकते. संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीरात दोन चमच्यांपेक्षा अधिक साखर जाणार नाही, ह्याची काळजी घ्या.

पाणी प्या-
भरपूर पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा दावा सत्य आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. अधूनमधून पाणी पित रहा. कोमट पाणी प्यायलात तर आणखी उत्तम.

लिक्विड कॅलरीज आणि व्हाइट रिफाइन्ड कार्ब्ज टाळा-
सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, चॉकलेट मिल्क, एनर्जी ड्रिंक्स ह्यांमधून शरीरात लिक्विड कॅलरीज जातात आणि व्हाइट ब्रेड, पास्ता, पेस्ट्री, मिठाई ह्यांमधून रिफाइन्ड कार्ब्ज. शक्यतो ह्यांचं सेवन टाळा.

ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या-
कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आपण सर्वजण जगत असताना मन शांत राहणं किंवा तसं ते जाणीवपूर्वक ठेवणं हे सोपं नाही, ह्याची मला कल्पना आहे. पण कोरोनाविषयी अधिक विचार करणं किंवा त्याविषयी चिंता करत बसणं, ह्यामुळे तुम्हाला कोणताही लाभ होणार नाहीए. हा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ का होईना, पण नियमित ध्यानधारणा करा. झोपही पुरेशी घ्या. 

व्यायाम करा-
घरातच असलात तरी अॅक्टिव्ह रहा. सूर्यनमस्कार, योगासनं किंवा दोरीच्या उड्या हे व्यायाम तुम्ही घरात सहज करू शकता.

(डॉ. स्नेहल अडसुळे ह्या न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून 'वूमन मेटाबोलिझम डाएट' ह्यात विशेषज्ञ आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस