Join us
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:13 IST

Open in App
1 / 10

टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा खिताब जिंकल्यानंतरही कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एका रिपोर्टनुसार बीसीसीआय सूर्याच्या बॅटमधून निघणाऱ्या कमी धावांमुळे निराश असल्याचं बोललं जाते. ३५ वर्षीय सूर्याने कॅप्टन म्हणून विजयाचा दर ७६.९२ टक्के कायम ठेवला परंतु वैयक्तिक खेळात तो अजूनही संघर्ष करत आहे.

2 / 10

वर्ल्डकपमध्येही सूर्याच्या बॅटमधून २४२ धावांपैकी ८४ धावा केवळ अमेरिकेविरोधात खेळताना आल्या होत्या. मोठ्या सामन्यात सूर्याची बॅट तळपली नाही. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती श्रेयस अय्यरला संघात परत आणण्याचा आणि २०२८ च्या ऑलिम्पिक तसेच विश्वचषकाच्या पुढील सत्रासाठी कर्णधारपद सोपवण्याचा विचार करत आहे. TOI ने हे वृत्त दिले आहे.

3 / 10

सूर्याच्या खराब फॉर्ममागे त्याच्या उजव्या मनगटाची दुखापत हे एक प्रमुख कारण सांगितले जात आहे. सूत्रांनुसार सूर्या गेल्या काही काळापासून मनगटावर जाड टेपिंग लावून खेळत आहे. मुंबई इंडियन्ससोबतच्या त्याच्या हंगामापासून तो वेदना सहन करत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत आहे.

4 / 10

वर्ल्डकप काळातही सूर्याला नेट सेशनआधी टीमचे डॉक्टर रिझवान खान त्याच्या मनगटावर पॅड लावतानाही दिसले होते. परंतु सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी याला सामान्य थकवा म्हणून टाळले होते. परंतु आता या दुखापतीचा त्याच्या खेळावर परिणाम होत आहे हे स्पष्ट झाले आहे आणि निवड समिती त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मनःस्थितीत नाही.

5 / 10

जुलै २०२४ मध्ये कॅप्टनपद स्वीकारल्यापासून सूर्याच्या प्रभावी फलंदाजीच्या आकडेवारीत लक्षणीय घट झाली आहे. नेतृत्व जबाबदारी स्वीकारल्यापासून त्याने ४५ सामन्यांमध्ये केवळ ९३२ धावा केल्या आहेत, जी त्याच्या पूर्वीच्या विक्रमापेक्षा मोठी घसरण आहे.

6 / 10

वयाच्या ३५ व्या वर्षी वाढत्या फिटनेसच्या समस्या आणि तरुण खेळाडूंना संधी देण्याचे धोरण सूर्याच्या विरोधात जात आहे. निवडकर्त्यांच्या मते टी-२० फॉरमॅटमध्ये एका नवीन दृष्टिकोनाची गरज आहे. विशेषतः जेव्हा टीम आयर्लंड आणि इंग्लंडसारख्या महत्त्वाच्या परदेशी दौऱ्यांवर जाणार आहे.

7 / 10

सूर्याच्या जागी कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर आघाडीवर आहे. अय्यर केवळ टी-२० संघात परत येऊ शकत नाही तर त्याला थेट कर्णधारपदही दिले जाऊ शकते. अय्यरला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे आणि तो मधल्या फळीला बळकटी देऊ शकतो.

8 / 10

सूर्याने पुढील दोन वर्षे कर्णधार म्हणून कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे, परंतु अंतिम निर्णय अशा लोकांच्या हाती आहे ज्यांना त्याच्या फलंदाजी आणि वयाबद्दल साशंकता आहे. भारतीय क्रिकेटमधील अधिकृत नेतृत्व बदलाची घोषणा पुढील काही आठवड्यांत केली जाऊ शकते.

9 / 10

आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत चेहऱ्यांची खास झलक पाहायला मिळत आहे. यंदाचा हगाम गाजवणाऱ्या अनेक चेहऱ्यांना लकवकर मेगा लॉटरी लागणार असल्याचे बोलले जाते. बीसीसीआयने एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ मैदानात उतरवण्यासाठी मेगा प्लॅन आखल्याचेही काही दिवसांपूर्वी समोर आले.

10 / 10

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि भारत विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यातील द्विपक्षीय टी-२० मालिका एकाच वेळी पार पडणार आहे. त्यामुळे बीसीसीआय टीम इंडियाचे दोन वेगवेगळ्या स टी-२० संघांची बांधणी करणार आहे. यासाठी ३०-३५ क्रिकेटर्संची संभाव्य यादीही तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयसूर्यकुमार यादवटी-20 क्रिकेटश्रेयस अय्यर